रोहित वाळके
ADVERTISEMENT
Ahmednagar Crime News : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांच्या अंगावर काट आला आहे. अहमदनगर येथे एका विहिरीत पडलेल्या मांजरीचा जीव वाचवण्याच्या नादात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लोक मांजरीचा जीव वाचवण्यासाठी एकापाठोपाठ विहिरीत उतरले होते पण, विषारी वायूमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. घटनेसंबंधित माहिती मिळताच पोलीस तत्काळ पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. (Shocking incident in Ahmednagar 5 people lost their lives cause they trying to save the cat which falls in well)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अहमदनगर येथील वाडकी गावात घडली. येथे रात्रीच्या सुमारास एक मांजर विहिरीत पडली. ही मांजर ज्या विहिरीत पडली होती ती बऱ्याच वर्षांपासून बंद आहे. त्यात उकीरड्याप्रमाणे कचरा टाकला जात होता. ज्यामुळे त्यात बायोगॅस तयार झाला होता. परिसरातील आजूबाजूच्या लोकांना मांजर या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ते तिला वाचवण्यासाठी तिथे पोहोचले.
अथक प्रयत्नांनंतर लोकांनी शेवटी विहिरीत उतरण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला जेव्हा एक व्यक्ती उतरला तेव्हा तो पुन्हा वरती आला नाही. यानंतर त्याला पाहण्यासाठी दुसरा व्यक्ती उतरला तर तो ही बाहेर आला नाही. अशाप्रकारे मांजरीला वाचवण्याच्या नादात एकामागोमाग उतरलेल्या 6 जणांपैकी 5 जणांचा जीव गुदमरून मृत्यू झाला. तर एकाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यूचं मुख्य कारण म्हणजे विहिरीत विषारी वायू होता ज्यामुळे खाली उतरलेल्यांचा श्वास कोंडला गेला.
'या' धक्कादायक प्रकरणाबाबत पोलीस काय म्हणाले?
या घटनेबाबत अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी धनंजय जाधव यांनी सांगितले की, 'माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी बचाव पथकासह मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सहापैकी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एकाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.'
ADVERTISEMENT