सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतल्या जंगलात एक महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळली आणि देशभर खळबळ उडाली. ही महिला नेमकी कोण आहे? तिला या जंगलात साखळीने नेमक का आणि कोणी बांधलं? किती दिवसांपासून ती या अवस्थेत होती? या सगळ्या प्रश्नांचा खुलासा आता झाला आहे. या प्रकरणात नेमकं काय आणि कसं कसं घडलं, जाणून घेऊया सविस्तर. (sindhudurga what happened with american woman in the forest of sawantwadi shocking preliminary statement came out)
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी कराडीचे डोंगर आहेत. या डोंगरातील जंगलाच्या परिसरात शनिवारी म्हणजे 27 जुलैला सकाळी काही गुराखी आणि शेतकरी गुरं चारण्यासाठी गेले. या परिसरात गेल्यावर त्यांना अचानक महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. तो आवाज ऐकल्यानंतर सर्वांनी त्या दिशेनं शोधाशोध सुरू केली. त्यांनतर त्यांना जे काही दिसलं त्याने ते सगळे गुराखी घाबरून गेले.
हे ही वाचा>> Yashashree Shinde : दाऊद शेखने यशश्रीची का केली हत्या? पोलिसांकडून मोठा खुलासा
त्या जंगलात एका झाड्याच्या बुंध्याला एका महिलेच्या पायाला साखळदंड बांधून ठेवण्यात आलेले होते. जेव्हा गुराख्यांनी त्या महिलेलं पाहिलं तेव्हा तिची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यामुळे त्यांनी लगेचच पोलीस आणि गावकऱ्यांना या संदर्भात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मागील 3 दिवसापासून ती महिला त्या जंगलात होती. जेव्हा पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा 3 दिवस उपाशी असल्यामुळे ती बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हती. आता तिची मनस्थिती सुधारल्यावर पोलिसांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने इंग्रजीतून कागदावर जे काही लिहिलं त्याने पोलीसही हादरले.
महिलेची 'ती' कहाणी ऐकून तुम्हीही हादरून जाल!
ललिता कायी कुमार एस. अस या महिलेचं नाव आहे. ती मूळ अमेरिकेची आहे. पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहत होती. तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार करत तिला घातक आणि चुकीची औषध दिली आणि या जंगलात बांधून ठेवलं, अशी धक्कादायक माहिती तिने दिली.
अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी तिला गोव्यातील बांबोळीच्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. त्या ठिकाणी तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा>> Crime : पत्नीला आधीपासूनच होता मुलगा, सत्य समजताच नवऱ्याने दाखवलं खरं रूप!
तपासात महिलेजवळ मोबाइल आणि टॅब तसेच 31 हजार रुपये रोख सापडले आहेत. पोलीस मोबाइलच्या मदतीने अधिक तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणात आता अमेरिकन दुतावासानेही दखल घेतली आहे. घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी अमेरिकन दूतावासाने केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. या महिलेकडे सापडलेला पासपोर्ट अमेरिकेचा असल्याचंही आता समोर आलं आहे.
या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक टीम तमिळनाडू तर दुसरी टीम गोव्यात रवाना झाली आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असतात त्यामुळे गोव्यात देखील याचा तपास केला जाणार आहे. तसेच ही महिला गेल्या दहा वर्षापासून तमिळनाडूत वास्तव्यास असल्याने तिथेही तपासाच्या दृष्टीने पोलीस दाखल झाले आहेत.
या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पती विरोधात बांदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याच मोठं आव्हान आता पोलीसांसमोर आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तामिळनाडूतल्या तिच्या मूळ पत्त्यावर तपासासाठी गेली असून तिथल्या तपासानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. तर पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी आणि का बांधण्यात आलं? या प्रश्नाची उत्तर समोर येतील.
ADVERTISEMENT