Murder Case: बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने (Student) आपल्या गर्लफ्रेंडबरोबर गोव्यात जाऊन व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) साजरा करण्याचे ठरवले होते, मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. गोव्यात जाऊन गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी विद्यार्थ्याने थेट आपल्या मामीची हत्या (Aunt's murder) करून तिच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
ADVERTISEMENT
तिच्या गळ्यातील दागिने विकून त्याने आपल्या गर्लफ्रेंडबरोबर गोव्यात जाऊन मौजमजाही केली. मात्र तीन आठवड्यानंतर या घटनेचा उलघडा झाल्यानंतर आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हे ही वाचा >> धक्कादायक! आईने दोन मुलांसह केली आत्महत्या, सोलापूर हादरलं
या प्रकरणातील आरोपीचे नाव यशवंत असून तो बेंगळुरुच्या विजयवाडामधील एका अभियांत्रिकीमध्ये तो बीटेक करत आहे. 11 फेब्रुवारी रोजी तो आपल्या मामाच्या घरी गेला होता.
यशवंतचा मामा नरसिम्हा रेड्डी हे बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी टेक्नॉलॉजी हबमध्ये राहतात. त्यादिवशी यशवंत मामाच्या घरी गेला होता, मात्र त्यावेळी त्याचा मामा घरी नव्हता. त्यांची पत्नी सुकन्या रेड्डी घरी होत्या.
यशवंतचे त्याच्या मामीशी चांगले संबंध होते. त्यामुळे तो अनेकदा आपल्या मामाच्या घरी जात येत होता. 11 फेब्रुवारी रोजी यशवंतने त्याच्या मामीकडे त्याने खर्चासाठी पैसे मागितले होते.
त्याची कार खराब झाली असून मला ती दुरुस्त करुन घ्यायची असल्याचेही त्याने सांगितले. मात्र त्यावेळी त्याच्या मामीकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे दिले नाही. त्या गोष्टीचा त्याला राग आला होता. मात्र त्याने तो बोलून दाखवला नाही.
पैसे दिले नाहीत त्या रागातच त्याने मामीची हत्या करून पैसे उकळायचा कट रचला. त्याप्रमाणे त्याने मामीची हत्या केली आणि एका पोत्यात भरून त्याने निर्जनस्थळी घेऊन जाऊन पेट्रोल टाकून जाळून टाकले.
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पैशासाठी त्याने स्वतःच्या मामीची हत्या करून एका निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आला.
त्यानंतर त्याने मामीचे सगळे दागिने चोरून काही दागिने त्याने विकले वर तो मैत्रिणीला घेऊन गोव्यालाही गेला. त्या काळात त्याच्या मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली.
मामाने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरु केला. त्यावेळी त्यांच्या यशवंतचे नाव पुढे आले. त्यानंतर तपास केला असता काही मृताचे काही दागिने त्याच्याकडे सापडले व काही दागिने त्याने विकल्याचे कबूल केले.
ADVERTISEMENT