Suchana Seth: कफ सिरप पाजला अन् चिमुकला झोपी गेल्यावर…सूचना सेठने मुलाला कसं संपवलं?

प्रशांत गोमाणे

• 11:37 AM • 10 Jan 2024

सूचनाने एक ट्रिप प्लान केली, हॉटेल बुक केले होते. मुलाला कसे मारायचे, हे देखील तिने ठरवले होते. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सूचना सेठने तिच्या मुलाच्या हत्येचा कट रचला होता.

suchana seth killed her son gives 2 bottle cough syrup befor killing use pillow for murder goa murder shocking story

suchana seth killed her son gives 2 bottle cough syrup befor killing use pillow for murder goa murder shocking story

follow google news

Suchana Seth, Goa Murder : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्ट कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांनी आपल्याच पोटच्या 4 वर्षीय चिमुकल्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. सूचना सेठने मुलाच्या हत्येची संपूर्ण प्लानिंग केली होती. यासाठी सूचनाने एक ट्रिप प्लान केली, हॉटेल बुक केले होते. मुलाला कसे मारायचे, हे देखील तिने ठरवले होते. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे सूचना सेठने तिच्या मुलाच्या हत्येचा कट रचला होता. दरम्यान ही संपूर्ण मर्डर स्टोरी काय आहे? सूचना सेठने तिच्या मुलाची हत्या का केली? या हत्येमागचं कारण काय? हे जाणून घेऊयात. (suchana seth killed her son gives 2 bottle cough syrup befor killing use pillow for murder goa murder shocking story)

हे वाचलं का?

कशी केली हत्या?

घटनास्थळ म्हणजेच ज्या हॉटेलमध्ये सूचना मुलासह वास्तव्यास होती. त्या हॉटेलच्या स्टाफमुळे सूचनाचं हे कटकारस्थान उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी सूचनाला ताब्यात घेऊन तिची सुटकेस तपासली असता मुलाचा मृतदेह सापडला होता. आता या प्रकरणात सूचना सेठने नेमकी मुलाची कशी हत्या केली होती. याची माहिती समोर आली आहे. ज्या हॉटेलमध्ये सूचना सेठ वास्तव्यास होती. त्या हॉटेलच्या एका स्टाफद्वारे तिने बाहेरून एक कफ सिरप मागवला होता. या कफ सिरपचा हाय डोजने तिने सुरूवातीला मुलाला पाजला. हा डोज पिल्यानंतर मुलगा झोपी गेला होता, यानंतर तिने त्याची हत्या केली होती.

हे ही वाचा : MLA Disqualification: शिंदेंचा निकाल ठरवणार अजित पवारांचं भविष्य

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सूचनाने हत्येसाठी उशी किंवा टॉवेलचा वापर केला होता. या दोघांपैकी एका गोष्टीने तिने मुलाचा तोंड दाबून त्याची हत्या केली आहे,अशी माहिती आता हिरयुर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रभारी यांनी डॉक्टर कुमार नाईक यांनी दिली आहे. मुलाच्या हत्येनंतर सूचनाने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती आहे.

कशी अडकली पोलिसांच्या जाळ्यात?

खरं तर सूचना सेठ या मुलासह तीन दिवसाच्या गोवा ट्रिपवर आल्या होत्या. या ट्रिपदरम्यान हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली. या हत्येनंतर मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून हॉटेलमधून फरार होण्याच्या तयारीत होत्या.मात्र हॉटेल स्टाफच्या सतर्कतेमुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली. त्याचं झाल असं की सूचना सेठ हॉटेलमध्ये चेक ईन करताना आपल्या 4 वर्षीय मुलासोबत आल्या होत्या. मात्र चेक आऊट करताना त्या एकट्याच बाहेर पडल्या. यावर स्टाफला संशय आला. त्याचसोबत त्यांच्या खोलीत देखील रक्ताचे डाग सापडले होते. त्यामुळे स्टाफला संशय आणखीणच बळावल्याने त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आणि कॅब चालकाच्या मदतीने सूचना सेठ पोलिसांच्या जाळ्यात सापडली.

हे ही वाचा : MLA Disqualification: CM शिंदेंविरोधात निकाल गेला तर.. असं बदलेल महाराष्ट्राचं राजकारण

‘या’ कारणामुळे रचला हत्येचा कट

सूचना सेठचं लग्न 2010 मध्ये झालं होते, ती मुळची पश्चिम बंगालची, मात्र तिचा नवरा हा केरळचा होता. लग्नानंतर त्या दोघांना एक मुलगा झाला. मात्र 2020 मध्ये त्या पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. आणि प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला, मात्र त्यावेळी न्यायालयाने वडील त्याच्या मुलाला दर रविवारी भेटू शकतात असा निर्णय दिला होता. कोर्टाच्या या निर्णयामुळे ती प्रचंड नाराज आणि तणावात राहू लागली. तिला अजिबात असं वाटत नव्हतं की, तिच्या नवऱ्याने तिच्या त्या मुलाला भेटावं. यातूनच तिने तिच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी आता पोलिसांनी सूचना सेठ यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

    follow whatsapp