UP Crime :उत्तर प्रदेशातील लखनऊमधील (Uttatr Pradesh Lucknow) भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश शुक्ला (MLA Yogesh Shukla) यांच्या घरामध्ये श्रेष्ठ त्रिपाठी (Shreshth Tripathi) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याने आमदारांच्या घरात आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी आपल्या गर्लफ्रेंडला फोन करुन तो आमदारांच्या घरामध्ये भेटायला बोलवत होता. बंगल्यावर भेटण्याच्या संदर्भात त्या दोघांचा व्हिडीओ कॉलही (Video Call) झाला होता. त्या व्हिडीओ कॉलनंतरच श्रेष्ठ त्रिपाठीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (suicide case Uttar pradesh lucknow bjp mla yogesh shukla house shrestha tripathi had video call to girlfriend)
ADVERTISEMENT
व्हिडीओ कॉलवरुन वाद
श्रेष्ठ त्रिपाठी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडीओ कॉल झाला त्यावेळी तिने स्क्रीनशॉट काढून तिने ते पोलिसांना आधीच दिले होते. या सगळ्या घटनेची माहितीही तिने पोलिसांना दिली होती. त्यानंतर ती आमदारांच्या बंगल्यावर पोहचली तेव्हा बंगल्याचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना तिने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन बंगल्याचा दरवाजा तोडला. तेव्हा श्रेष्ठ त्रिपाठी लटकलेल्या अवस्थेत होता. ते दृश्य बघून त्याची गर्लफ्रेंड बेशुद्ध पडली होती.
हे ही वाचा >> संजय राऊत, दानवेंच्या अडचणी वाढणार? नितेश राणेंची विधिमंडळ सचिवांकडे तक्रार
पाच वर्षापासून मैत्री
पोलिसांनी या घटनेची माहिती घेताना त्याच्या गर्लफ्रेंडचीही माहिती काढली. त्यावेळी तिने सांगितले की, गेल्या पाच वर्षापासून ती दोघं एकमेकांना ओळखत होती. एकमेकांना फोन आणि व्हिडीओ कॉलवर बोलत होती. पोलिसांनी सांगितली श्रेष्ठचे गर्लफ्रेंड ही लखनऊची राहणारी आहे.
आमदारांच्या सोशल टीमचा सदस्य
भाजपचे आमदार योगेश शुक्ला यांच्या बंगल्यावर ही घटना मध्यरात्री बारा वाजता घडली होती. श्रेष्ठ त्रिपाठी हा योगेश शुक्ल यांच्या सोशल मीडियाच्या टीममध्ये काम करत होता.
हे ही वाचा >> पुणे : भरधाव कारने स्थलांतरित मजुरांना चिरडले, तीन जण ठार
कुटुबीयांसह मित्रांना धक्का
या घटनेची माहिती श्रेष्ठ त्रिपाठीच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्रांना दिली आहे. गळफास घेतल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा मोबाईल पडला होता. तोही तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांना पुढील तपास चालू केला आहे.
ADVERTISEMENT