Crime: बदलापूर घटनेची पुनरावृत्ती! 'चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला फाशी द्या', लोकांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई तक

07 Oct 2024 (अपडेटेड: 07 Oct 2024, 06:56 PM)

Minor Girl Sexual Assault Case: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. नराधम शिक्षकाने साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रतिकात्मक फोटो

त्रिपुरा: अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार या POCSO प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली

follow google news

बातम्या हायलाइट

point

माजलगाव शहरात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती

point

माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

point

त्या आरोपी शिक्षकाला न्यायालयाने सुनावली शिक्षा

Minor Girl Sexual Assault Case: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. नराधम शिक्षकाने साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपी शिक्षकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तीव्र पडसाद उमटले असून नांदेड जिल्ह्यातील ज्वेलर्स व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला आहे. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे शिक्षकाने एका  चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नांदेड जिल्ह्यातील सर्व सोने चांदी व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील सर्व ज्वेलर्स दुकानदारांनी कडकडीत बंद पाळत आरोपी नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना केली.

हे ही वाचा >> Video: काय सांगता! टोपलीभर लसूण झटपट होतील सोलून; फक्त 'या' ट्रिक्सचा वापर करा

तसच याप्रकरणी कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नांदेडचे सराफा व्यापारी दिपक बोधने यांनी दिला आहे.  माजलगाव शहरात शिक्षकाने साडे पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने नांदेड जिल्ह्यातील व्यापारांनी शहरात कडकडीत बंद पाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या घटनेमुळं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, नाहीतर आम्ही आंदोलन करू, असा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहेे. 

    follow whatsapp