Thane crime news : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात अटकेची मोठी कारवाई केली. एटीएसने तीन जणांना भिवंडीतून अटक केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशी नागरिकांना रेशनकार्ड बनवून दिल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ठाण्यातील भिवंडी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. ठाणे परिसरात बनावट शिधापत्रिका बनवणारे काही लोक असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले.
हेही वाचा >> Khalistan movement : कॅनडा कसा बनला खलिस्तानवाद्यांचा बालेकिल्ला?
कोण आहेत आरोपी, प्रकरण नेमकं काय?
इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नौशाद रेशन दुकान चालवतो, तर इतर दोन लोकांवर बनावट कागदपत्रे बनवून लोकांना रेशन कार्ड मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा >> ‘आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही’, माजी प्राध्यापिकेला का हवंय इच्छामरण?
एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशातील नागरिकांना भारतीय कागदपत्रे बनवून देण्यासाठी त्या लोकांकडून पैसे घेत. त्यांना बनावट रेशन कार्ड बनवून देत होते, जेणेकरून त्यांची बांगलादेशी म्हणून ओळख होऊ नये. एक रेशन कार्ड 8 हजार रुपयात बनवून देत होते, अशी माहिती आहे. या प्रकरणात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे रॅकेट आहे का, याचाही शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT