Uttar Pradesh Crime News : लग्न म्हटलं तर प्रत्येकजण नटून-थटून जातो. स्वत:च्या सुंदरतेत किंचीतसाही फरक राहू नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशात अनेकदा लग्नात काहितरी राहुन जातंच अथवा काहीतरी चुक घडते. जसे जेवण अंगावर पडते. अथवा कुणाच्यातरी चुकीमुळे आपलेच कपडे खराब होतात. अशाच एका लग्नात उष्ट्या प्लेटचा स्पर्श झाल्याने एका वेटरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला होता. या घटनेने सध्या गाझियाबाद हादरलं आहे. नेमकं या घटनेत काय घडलंय, हे जाणून घेऊयात. (uttar pradesh crime three friends killed waiter just from upper plate was touched ghaziabad crime story)
ADVERTISEMENT
उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Ghaziabad) ही धक्कादायक घटना घडली आहे. गाझियाबादच्या अंकुर विहार पोलीस ठाणे हद्दीत 18 नोव्हेंबरला एका जंगलात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे नाव पंकज असल्याचे तपासात समोर आले. या वेटरची तीन जणांनी मिळून हत्या केल्याची घटना घडली होती.
हे ही वाचा : Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
गेल्या 17 नोव्हेंबरला सीजीएस वाटीकामध्ये एका लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकज वेटरचे काम करत होता. पंकज त्याचे काम करत असताना त्याचा हातून एक चुक घडते. कार्यक्रमाला पाहूणे म्हणून आलेल्या ऋषभ आणि त्याचे दोन मित्रांना चुकून उष्ट्या प्लेटचा स्पर्श होतो. यानंतर ऋषभ आणि त्याचे मित्र वैतागतात आणि पंकजला बेदम मारहाण करायला सूरूवात करतात. इतक्यावरच हे पाहूणे थांबले नाही, तर त्यांनी त्याला जमीनीवर लोळवून मारहाण केली, त्याचे धारदार वस्तुवर डोकं देखील आपटलं. या घटनेत त्याचा जागीच जीव गेला. या घटनेनंतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला होता.
हे ही वाचा : Video : गंभीर-श्रीसंत मैदानातच भिडले, सामना सुरू असताना काय घडलं?
दरम्यान पंकजच्या या हत्येनंतर पोलीस आरोपींच्या मागावर होते, मात्र त्यांचा काही एक सुगावा लागत नव्हता. अखेर बुधवारी पोलिसांनी तिन्ही आरोपींची लोकेशन ट्रेस करून त्यांना अटक केली आहे. सध्या या आरोपींची चौकशी सुरु आहे. तसेच पोलिसांनी या तीनही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आणि या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
ADVERTISEMENT