‘पप्पा ते मला मारतील, QR कोडवर 30 हजार पाठवा’, वसईत मुलाने बापालाच घातला गंडा

रोहिणी ठोंबरे

• 11:27 AM • 10 Dec 2023

पालघर जिल्ह्यातील (Palghar District) एका 20 वर्षीय मुलाने वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी कहरच केला. या मुलाने स्वत:च्याच अपहरणाच कट रचला. रविवारी (10 डिसेंबर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्यात वसईतील फादरवाडी भागातील रहिवाशाची तक्रार आली.

Mumbaitak
follow google news

Vasai Fake Kidnapping Case : पालघर जिल्ह्यातील (Palghar District) एका 20 वर्षीय मुलाने वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी कहरच केला. या मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा (Kidnapping Plan) कट रचला. रविवारी (10 डिसेंबर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालीव पोलीस ठाण्यात वसईतील फादरवाडी भागातील रहिवाशाची तक्रार आली की, त्यांचा मुलगा 7 डिसेंबर रोजी घराबाहेर गेला होता, पण परत आला नाही. पोलिसांनी 8 डिसेंबर रोजी तो हरवल्याची नोंद केली. (Vasai Fake Kidnapping Case a 20 years boy called his Father for extract Money)

हे वाचलं का?

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान तक्रारदाराने सांगितले की, त्याला त्याच्या मुलाचा फोन आला होता. मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले की, तीन लोकांनी त्याचे अपहरण केले, त्याला बंदिस्त केले आणि 30,000 रुपयांची खंडणी मागितली. नाही दिल्यास ते त्याला ठार मारतील. पेमेंटसाठी मुलाने वडिलांना QR कोडही पाठवला होता.

वाचा: Mayawati : बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?

पोलिसांनी मुलाला शोधून कसं काढलं?

पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आणि त्यांनी वसई, विरार, नालासोपारा आणि इतर ठिकाणी मुलाचा शोध घेतला. विविध सूत्रांवर काम केल्यानंतर पोलिसांनी शनिवारी वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेतला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला वडिलांकडून पैसे हवे असल्याचे समोर आले. वडील मुलाला पैसे द्यायला तयार नव्हते.

वाचा: Tobacco : अक्षय, शाहरूख आणि अजय देवगणला कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यामुळेच त्याने आपल्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा कट रचला. पोलिसांनी 20 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाने त्याच्या वडिलांना पाठवलेला QR कोड त्याच्या ओळखीच्या व्यक्तीचा होता. वडिलांनीही पैसे पाठवले नव्हते.

    follow whatsapp