Pune Crime: रस्त्यात गाठलं, नंतर…; पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून काढला काटा

मुंबई तक

24 Jul 2023 (अपडेटेड: 24 Jul 2023, 02:13 PM)

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालूक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा (Husband) पत्नीनेच प्रियकरासह (Boyfriend) मिळून काटा काढल्याची घटना घडली आहे. हरिश्चंद्र थोपटे (42) असे या मृत पतीचे नाव आहे. हरीश्चंद्र थोपटे हे कामावरून घरी जात असताना पत्नीच्या प्रियकराने साथिदारांसह मिळून थोपटे यांना रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली होती.

wife and her boyfrind killed husband immoral relationship baramati crime story

wife and her boyfrind killed husband immoral relationship baramati crime story

follow google news

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालूक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा (Husband) पत्नीनेच प्रियकरासह (Boyfriend) मिळून काटा काढल्याची घटना घडली आहे. हरिश्चंद्र थोपटे (42) असे या मृत पतीचे नाव आहे. हरीश्चंद्र थोपटे हे कामावरून घरी जात असताना पत्नीच्या प्रियकराने साथिदारांसह मिळून थोपटे यांना रस्त्यात गाठून धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी (police) पत्नीसह 9 जणांना अटक केली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. (wife and her boyfrind killed husband immoral relationship baramati crime story)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरे खुर्द परीसरात हरिश्चंद्र थोपटे (42) नामक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता. हरिश्चंद्र थोपटे यांच्या बायकोचे धीरज धावरे नावाऱ्या तरूणासोबत अनैतिक संबंध होते. साधारण गेल्या 3 वर्षापासून दोघांमध्ये संबंध सुरु होते. या अनैतिक संबंधाची कुणकुण हरिश्चंद्र थोपटे यांना लागली होती का? याबाबतची माहिती अद्याप तरी पोलीस तपासात समोर आली नाही आहे. मात्र हरिश्चंद्र थोपटे हे बायकोच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होते, इतकं मात्र नक्की. यातूनच पत्नीने प्रियकर धीरज धावरेसह मिळून पतीचा हत्येचा कट रचला होता.

हे ही वाचा : ‘मला म्हणाली जयपूरला जातेय आणि पोहोचली पाकिस्तानात’, अंजूच्या पतीचे मोठे खुलासे

ठरल्यानुसार धीरज धावरे आपल्या साथिदार मित्रांसह नीरा डावा कालव्याजवळ घात घालून बसला होता. यावेळी हरिश्चंद्र थोपटे कंपनीचे काम पुर्ण करून दुचाकीने घरी परतत होते. यावेळी धीरज धावरे यांच्यासह त्यांच्या साथीदाराने थोपटे यांना रस्त्यातच रोखले. यानंतर धारदार शस्त्राने थोपटे यांच्यावर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात हरिश्चंद्र थोपटे यांचा जागीच मृत्यू झाला.

या हत्याकांडाची माहिती मिळताच जेजुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. यासोबत पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत अवघ्या 2 तासात आरोपींना अटक केली होती. सुरुवातीला या हत्याकांडात पत्नीचा सहभाग असल्याची माहिती मिळाली नव्हती. मात्र कसून तपास केला असता या हत्याकांडात मृत व्यक्तीच्याच पत्नीचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला होता. आता पोलिसांनी या प्रकरणात आता आरोपी पत्नीसह, धीरज उर्फ बंटी संजय धावरे, निकेश विरेंद्र सिंह ठाकुर, सिद्धांत संभाजी भोसले, सुरेश कांतिलाल कदले, लाखन सूर्यवंशी, रामदास जाधव, विशाल चव्हाण आणि शुभम मचारे या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जेजूरी पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहे.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

या प्रकरणावर डीवायएसपी तानाजी बरडे म्हणाले की, जेजूरी पोलीस ठाणे अंतर्गत निरा ओपीच्या पिंपरे गावात ही घटना घडली आहे. मयत हरिश्चंद्र थोपटे यांच्या पत्नीचे मुख्य आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून मुख्य आरोपीने साथिदारासह मिळून थोपटे यांची हत्या केली होती. आरोपींवर भांदवी 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नीसह 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सांडभोर करत असल्याची माहिती बरडे यांनी दिली आहे.

    follow whatsapp