Pune Crime: हसन मुश्रीफांचं नाव वापरलं अन् पुण्यातील महिलेची 'अशी' केली फसवणूक

मुंबई तक

15 Aug 2024 (अपडेटेड: 15 Aug 2024, 09:35 PM)

Crime News: पुण्यात एका महिलेची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव वापरून ही फसवणूक केली गेली.

पुण्यातील महिलेची 'अशी' केली फसवणूक

पुण्यातील महिलेची 'अशी' केली फसवणूक

follow google news

बातम्या हायलाइट

point

हसन मुश्रीफांचं नाव वापरून पुण्यातील महिलेची फसवणूक

point

तोतया पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

point

'माझ्या बदनामीचं षडयंत्र असावं', मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने पुणे येथील एका महिलेकडून तब्बल वीस लाख रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झालेल्या महिलेचं नाव उषा मुरलीधर व्यास असं आहे. दरम्यान, या प्रकरणी तोतया पोलीस नरेंद्र गुप्ता याच्यावर हडपसर पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman has been cheated of rs 20 lakh in pune shockingly this fraud was done using the name of ncp minister hasan mushrif)

हे वाचलं का?

दरम्यान, या घटनेवर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, 'समरजीतसिंह घाटगे यांच्या पत्नीचीही 20 लाखाची फसवणूक झाली होती. त्यामुळं वीस लाख रुपये आकड्याचा हा योगायोग काय आहे?' असा सवालही त्यांनी केला.

हे ही वाचा>> प्रसिद्ध यूट्यूबर तरुणीचा 'तो' Video लीक! इंटिमेट व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये खळबळ

'माझी बदनामी करण्याकरिता हे षडयंत्र असावं. याप्रकरणी आपण पुणेचे पोलीस आयुक्त यांना, संबंधित घटनेबाबत कठोर कारवाई करून चौकशी करण्याच्या सूचना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा घटनेबाबत कारवाई का होत नाही?, आरोपींना अटक का होत नाही?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सायबर क्राईम गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ

देशात अनेक ठिकाणी सायबर गुन्हे होत असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात देखील या गुन्ह्यांचं प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. अनेक सुशिक्षित लोकं देखील सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांना बळी पडत आहेत. त्यामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढत आहे.

हे ही वाचा>> Crime : सासऱ्याने कोर्टातच IRS जावयाला घातल्या गोळ्या

दरम्यान, सायबर क्राईममधील वाढती गुन्हेगारी आणि त्या तुलनेत गुन्ह्यांचा होणार तपास यामध्ये बरीच तफावत आढळून येत आहे. सायबर क्राईममधील अनेक गुन्ह्यांमध्ये चोरट्यांचा तपासच लागत नाही. सायबर क्राईम सेलकडे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा असूनही चोरटे मात्र फारसे त्यांच्या हाती लागत नाही. ज्यामुळे दिवसेंदिवस या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. 

आता तर चक्क एका मंत्र्याच्या नावाने महिलेची तब्बल 20 लाखाची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन या प्रकरणाचा नेमका छडा लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp