Women take a revenge with Boss : देशात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खुप मोठी आहे.या कर्मचाऱ्यांची (Women Worker) बॉसकडून खुप पिळवणूक होते. या पिळवणूकीबद्दल किस्से एकूण तुम्ही थकून जाल, इतकी पिळवणूक होते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेगवेगळे किस्से आहेत. असाच एका बॉसच्या (Boss) पिळवणूकीचा किस्सा एका महिला कर्मचाऱ्याने सांगितला आहे. इतकेच नाही तर तिने या पिळवणूकीचा बदला घेतल्याची घटना सांगितली आहे. या घटनेची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. (women take a revenge with boss social media user appreciate)
ADVERTISEMENT
महिलेची बॉसकडून पिळवणूक
एका महिलेने (Women Worker) रेडीटवर बॉसकड़ून होणाऱ्या पिळवणूकीचा संपूर्ण किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगताना ती म्हणते, माझा बॉस माझ्याकडून खुप काम करवून घ्यायचा. तो माझ्याकडून 13-13 तास काम करून घ्यायाचा. मला माझं कर्ज चुकवायचं होत म्हणून मी नोकरी करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता, असे ती म्हणते आहे. कामाचे तासच नाही तर तो माझ्यावर रागाने बॉटल किंवा कि बोर्ड देखील फेकायचा. बॉसच्या या वागण्यावर मॅनेजमेंटचे म्हणणे होते की, तुम्हाला जर कंपनीत काम करायचे आहे, तर तुम्हाला या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतील. मी 2 वर्षाच्या या नोकरीत अनेकदा या पिळवणूकीवर रडले देखील आहे, असा अनुभव देखील ती सांगते.
हे ही वाचा : ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप
बॉसकडून घेतला बदला
महिला कर्मचारी पुढे म्हणते की, माझा पती शो आणि कॉन्सर्टना वॉलंटीयर करतो. माझ्या 2 वर्षाच्या नोकरीत ब़ॉसने माझ्याकडून त्याच्यासाठी आणि पत्नीसाठी कॉन्सर्टचे तिकीट घेतले होते. त्यामुळे एकिकडे मी त्याची पिळवणूक सहन करते आणि दुसरीकडे तो माझ्या मेहेरबानीवर आय़ुष्य एन्जॉय करतो. त्यामुळे मी ऑफीस सोडण्यापूर्वी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला होता.
महिला कर्मचाऱ्याकडून ऑफीस सोडण्यापूर्वी बॉसने शेवटी एकदा कॉन्सर्टचे तिकीट मागितले होते. ही तिकीटे देताना त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय़ तिने घेतला होता. त्यानुसार नेहमी शहरातल्या कॉन्सर्टची तिकीटे द्यायची. मात्र यावेळेस तिने शहरा बाहेरच्या कॉन्सर्टची तिकीटे दिली होती.तसेच या कॉन्सर्टच्या तिकीटाच्या क्युआर कोडमध्ये मोठा फेरबदल केला होता. जेणेकरुन बॉसला अद्दल घडावी.
बॉस ठरल्यादिवशी कॉन्सर्टला बायकोला घेऊन गेला. मात्र क्युआऱ कोड स्कॅन होत असल्या कारणाने त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्याला महिलेच्या पतीचे नाव देखील माहिते नव्हते.त्यामुळे बॉसने महिला कर्मचाऱ्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने एकही फोन उचलला नाही. त्यामुळे बॉसला इतक्या लांब प्रवास करून देखील कॉन्सर्ट पाहता आले नाही. अशाप्रकारे तिने बॉसला चांगली अद्दल घडवली.
हे ही वाचा : OYO मध्ये 4 मित्रांसोबत गेला नंतर छतावरून मारावी लागली उडी, भयंकर घटना
महिलाने या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.या पोस्टवर आता कर्मचारी आणि लाईक्स आणि कमेंट करतायत. अनेकांनी महिला कर्मचाऱ्यांनी बॉसला घडवलेल्या अद्दलीचे समर्थन केले आहे.अनेकांनी बॉसला अशीच अद्दल घडवली पाहिजे अशी भूमिका मांडलीय.तर अनेकांनी तरीही बॉस सुधारणार नाही अशी कमेंट केली आहे.
ADVERTISEMENT