Maharashtra Lok Sabha : भाजपचे बालेकिल्ले ढासळले! मराठवाड्यात प्रचंड हादरे

भागवत हिरेकर

05 Jun 2024 (अपडेटेड: 05 Jun 2024, 07:06 PM)

Marathwada Lok Sabha Election 2024 : मराठवाड्यात भाजप महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपने चारही जागा गमावल्या असून, महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.

महायुतीला मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार

follow google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ मराठवाडा

point

भाजपचे चारही उमेदवार पराभूत

point

एक जागा जिंकण्यात महायुतीला यश

Maharashtra BJP Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपची झोप उडवली. 2014 आणि 2019 मध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपला पूर्वीच्या जागाही राखता आल्या नाहीत. भाजपचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले. तीन मंत्री पराभूत झाले. पण, भाजपला सगळ्यात जास्त फटका बसला तो मराठवाड्यात! मराठवाड्यात भाजपची आधी ताकद किती होती आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीने कसे बदलले, समजून घ्या... (Big Setback To BJP In Marathwada, Lost All Lok Sabha Seats)

हे वाचलं का?

मराठवाड्यातील काही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. पण, या निवडणुकीत त्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लागला. जालना, बीड या दोन प्रमुख मतदारसंघासह लातूर, नांदेड या मतदारसंघातही भाजपचे पानिपत झाले. 

भाजपचे उमेदवार किती मतांनी पराभूत झाले? 

औरंगाबाद लोकसभा - शिवसेनेचे संदीपान भुमरे यांचा 1 लाख 34 हजार 650 मतांनी पराभव. 
जालना लोकसभा - भाजपचे रावसाहेब दानवे यांचा 1लाख 9 हजार 958 मतांनी पराभव. 
परभणी लोकसभा -  रासपचे महादेव जानकर यांचा 1 लाख 34 हजार 61 मतांनी पराभव. 
हिंगोली लोकसभा - शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर यांचा 1 लाख 8 हजार 602 मतांनी पराभव. 
नांदेड लोकसभा  - भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 59 हजार 442 मतांनी पराभव.
लातूर लोकसभा - भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा 61 हजार 881 मतांनी पराभव. 
उस्मानाबाद लोकसभा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा 3 लाख 29 हजार 846 मतांनी पराभव.
बीड लोकसभा - भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6 हजार 553 मतांनी पराभव.

हेही वाचा >> दिग्गजांना लोळवलं, महाराष्ट्रात 'हे' उमेदवार ठरले 'जायंट किलर'!

मराठवाड्यातील सर्व मतदारसंघावर नजर टाकली, तर भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीला प्रचंड मोठा झटका बसला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता इतर सातही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. 

भाजप चार लोकसभा मतदारसंघात पराभूत

भाजपने नांदेड, लातूर, जालना आणि बीड या चार लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रिंगणात होते. यात महत्त्वाची बाब म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री निवडणूक लढवत होते. तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या निवडणूक लढवत होत्या. 

दुसरीकडे 2014 आणि 2019 मध्ये भाजपने नांदेड आणि लातूर लोकसभा जिंकली होती. यावेळी या दोन्ही मतदारसंघात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने ज्या चार जागा मराठवाड्यातील गमावल्या, त्यापैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. तर एक जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे.

हेही वाचा >> महाराष्ट्रात राजकीय भूकंप... फडणवीसांची पत्रकार परिषदेत BJPला हादरवून टाकणारी घोषणा 

मराठवाड्यासारख्या महत्त्वाच्या विभागात 8 पैकी एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. हा मोठा फटका आहेच, पण महायुतीतील तीन पक्षांनाही मोठा फटका बसला आहे. आठपैकी १ जागाच महायुतीला स्वतःकडे ठेवता आली आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा वगळता जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या सातही जागा भाजप-शिवसेना महायुतीने जिंकल्या होत्या. पण, यावेळी एकच जागा महायुतीला जिंकता आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील निकाल भाजपबरोबरच महायुतीसाठी धक्का देणारा ठरला आहे.

    follow whatsapp