Uddhav Thackeray : "मोदींसोबत मैत्रीपेक्षा शत्रुत्व फायद्याचे, कारण...", ठाकरेंचे वर्मावर बाण

मुंबई तक

06 Jun 2024 (अपडेटेड: 06 Jun 2024, 09:09 AM)

Uddhav Thackeray Narendra Modi : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोदींवर टीकास्त्र डागले आहे. मोदी हे संकटात मदत करणाऱ्या मित्रांनाच संपवतात, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची नरेंद्र मोदींवर टीका.

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मोदींवर टीका

point

लोकसभा निवडणूक निकालावर शिवसेनेचे भाष्य

point

मोदी मित्रांनाच संपवतात, अशी ठाकरेंनी टीका केली

Maharashtra Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी आणि भाजपवर हल्ला चढवल्याचे दिसत आहे. 370 जागा मिळवण्याची घोषणा देणाऱ्या भाजपला 240 पर्यंतच मजल मारता आली असून, यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींच्या वर्मावर बोट ठेवले आहे. भटकती आत्मा असे संबोधत ठाकरेंच्या सेनेने काय म्हटलंय? (Uddhav Thackeray has criticized that Modi kills friends who help him)

हे वाचलं का?

सामना अग्रलेखातून शिवसेनेने (UBT) मोदी आणि भाजपच्या निकालावर भाष्य केले आहे. 

भटकता आत्मा लटकतोय

"भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत", अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे. 

"मोदी हे आता त्यांच्या ब्रॅण्डचे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत, तर त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला. मोदी सरकार, मोदी गॅरंटी, मोदी है तो मुमकीन है, मोदी तो भगवान है, अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली", अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेने टीकेचे बाण डागले आहेत. 

मोदींना राम पावला नाही -ठाकरे

"मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले", असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

हेही वाचा >> भाजपचे बालेकिल्ले ढासळले! मराठवाड्यात प्रचंड हादरे 

"भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा मोदी ब्रॅण्डचा चमत्कार नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला. मोदी यांनी महाराष्ट्रात 18 सभा व अनेक रोड शो केले. 18 पैकी 14 जागांवर भाजपचा पराभव झाला. मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले", असा टोलाही लगावला आहे. 

मोदींचे फोटो लावून शिवसेनेचे खासदार...

"भारतीय जनता पक्षाचा आरोप होता की, महाराष्ट्रात मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे खासदार जिंकले. भाजपचा हा भ्रम या वेळी लोकांनी तोडला. उद्धव ठाकरे यांचा चेहरा घेऊन शिवसेनेचे नऊ खासदार जिंकले व शरद पवारांचा चेहरा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार विजयी झाले. उलट महाराष्ट्रात ‘मोदी मोदी’ करणाऱ्यांचा आकडा 23 वरून 9 वर आला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या त्या मोदींशिवाय", असा पलटवार ठाकरेंनी केला आहे.

हेही वाचा >> दिग्गजांना लोळवलं, महाराष्ट्रात 'हे' उमेदवार ठरले 'जायंट किलर'! 

"मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी शत्रुत्व केले तर ते फायद्याचे ठरते. मोदी व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो हा अनुभव आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे. बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे. बाबूंना संपवायचा प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल", असे म्हणत ठाकरेंनी चंद्राबाबू नायडूंना इशारा दिला आहे.

हेही वाचा >> अजित पवारांच्या दोन नेत्यांमध्ये पडली ठिणगी, कारण ठरले जितेंद्र आव्हाड!

"भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्याबाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत", असेही ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटले आहे. 

    follow whatsapp