Uddhav Thackeray Criticize Raj Thackeray : राज्यातील महायुती सरकारमध्ये आता राज ठाकरेंचा मनसे पक्ष देखील सामील होण्याची शक्यता आहे. या संदर्भात मंगळवारी दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर विरोधकांकडून राज ठाकरेंना लक्ष्य केले जात आहे. त्यात आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरे- अमित शाह भेटीवर टीका केली आहे. (uddhav thackeray criticize raj thackeray meet amit shah delhi meet bjp mns alliance maharashtra politics buldhana news)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे आज बुलढाण्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान सिंदखेडातून जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. यावेळी माध्यमांना ''मला फक्त सांगितलं या म्हणून मी आलो'' असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली होती
हे ही वाचा : 'मेला तर पुन्हा बाय इलेक्शन', अजित पवारांची शिवतारेंनी उडवली झोप
राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेचा आधार घेत ठाकरे म्हणाले, ''जरा या म्हटलं की शेपूट हलवत जाताय, अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपटासारखे त्यांच्या चरणी लोटांगण घालताय, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली. तसेच मी असं कधीच आयुष्यात करू शकत नाही, असे देखील ठाकरेंनी यावेळी सांगितले.
'में अकेला सबपे भारी' अरे मोदी जी असं जर तुम्ही म्हणताय तर उद्धव ठाकरेला संपवण्यासाठी तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवावी लागते. सगळ्या कोपऱ्यात कोपऱ्यातला कचरा गोळा करतायत. सगळा कचरा गोळा करताय आणि उद्धव ठाकरेंशी लढतायत,असा टोला देखील ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान मोदींना लगावला.
हे ही वाचा : Madha Lok Sabha : भाजपकडून निंबाळकरांना तिकीट, धैर्यशील पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन
ठाकरे पुढे म्हणाले, इथला गद्दार, त्याला तर आपण काय करायच. किती वेळा आपण त्याला खासदार करायचं. किती वेळा करणार. जशी जी म्हण आहे ना, खाल्या मिठाला जागत नाही. तसा जो दिल्या मताला जागत नाही.तो गद्दार आहे, तुम्ही पुन्हा डोक्यावर घेणार. ही गद्दारी फक्त माझ्याशी नाही आहे. मी काय नव्हतं दिलं तुला, पहिला तुला आमदार केलं मग खासदार केलं. यांच मग म्हणतात ना, अबकी बार बार बार तसंच...प्रत्येक वेळा निवडणूक आली की हेच आपलं बुजगावण उभं. शिवसेनेमुळे ही राष्ट्रप्रेमी ज्वलंत लोक आहेत त्यामुळे तुम्ही निवडून देत होती. बुलढाणा तुमच्या सातबारा लिहलेला नाही. बुलढाणा म्हटलं की त्यावर कुणी उभाच राहणार नाही, कुणी जिंकणार नाही. तुझं डिपॉझिट जप्त करून दाखवतो, त्या गद्दाराला तुम्हाला पाडावच लागले, असा इशारा ठाकरेंनी नाव न घेता शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना दिला आहे.
ADVERTISEMENT