Shiv sena UBT Vs Election commission of india : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वीच मशाल गीत प्रसिद्ध केले होते. मात्र या गीतातील 'भवानी' आणि 'हिंदू' शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेत काढून टाकण्याचा आदेश दिला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशावर ठाकरेंनी ''आम्ही भवानी शब्द काढणार नाही'', अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता नेमकं या मशाल गीताचं पुढे काय होणार? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. त्यामुळे हे समजून घेण्यासाठी 'आज तक'ने निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे? आयोगाकडून गाण्यावर आक्षेप का घेतलाय? आणि प्रचारगीते बनवताना निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो? हे जाणून घेऊयात. (udhhav thackeray shiv sena ubt drop words jay bhavani and hindu on election campain song what was the rule election commission of india)
ADVERTISEMENT
गेल्या 24 ऑगस्ट 2023 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निवडणुकीच्या उद्देशाने वापरले जाणारे ऑडिओ व्हिज्युअल आणि गाणी हे निवडणुकीच्या अंतर्गत MCMC (मीडिया प्रमाणन आणि देखरेख समिती) द्वारे प्री-सर्टीफिकेशन असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी काही मापदंड नमूद केले आहेत. या नियमाचे पालन सर्वच पक्षांना करावे लागेल. प्री-सर्टीफिकेशन शिवाय कोणताही पक्ष निवडणुकीत कोणत्याही दृकश्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल) जाहिरातीचा वापर करू शकत नाही.
हे ही वाचा : ''म्हातारं लय खडूस आहे, तिजोरीची चावी कमरेला लावून हिंडतंय अन् अजितदादा...'',
आयोगाचा नियम काय?
मीडिया प्रमाणन आणि देखरेख समितीचे नियम 24 ऑगस्ट 2023 च्या ECI पत्राच्या अनुक्रमांक 2.5 मध्ये नमूद केले आहेत. त्यात म्हटले आहे की, राजकीय जाहिराती करताना राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी आदर्श आचारसंहिते अंतर्गत नमूद केलेले निकष लक्षात ठेवावे लागतील.
- पोस्टर, व्हिडिओ, ग्राफिक्स, संगीत इ. किंवा निवडणूक प्रचारात मंदिर/मशीद/चर्च/गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळात किंवा धार्मिक मजकूर/चिन्हे/घोषणे वापरता येणार नाहीत.
- लष्करी जवान आणि लष्कराचे समारोहाचे फोटोंचा वापर करता येणार नाही.
- कोणत्याही नेत्याच्या सार्वजनिक जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका केली जाणार नाही.
- असत्यापित आरोप किंवा विकृतीच्या आधारावर इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका करू नका.
आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रचार गीताबद्दल बोलायचं झालं तर हे गीत निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही. कारण ठाकरेंच्या मशाल गीतात ''जय भवानी'' या धार्मिक घोषणेचा वापर करण्यात आला आहे. पक्षाने प्रमाणीकरणासाठी केलेल्या अर्जात शिवसेनेच्या यूबीटीच्या गाण्यात दोन शब्द वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर गीतात बदल करून हे गाणे पुन्हा आयोगाकडे प्री-सर्टीफिकेशनसाठी (तपासणीसाठी) पाठवावे लागेल. निवडणूक आयोगाने आक्षेप घेतल्यानंतर पक्षाने फेरविचार आणि निर्णयाची मागणी केली होती, मात्र हे शब्द काढून टाकल्याशिवाय प्री-सर्टीफिकेशन (तपासणी) शक्य होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : सुप्रीम कोर्टाचा झटका! EVM ला क्लिनचीट, न्यायालयाचा फैसला काय?
दरम्यान आता महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, ऑडीओ व्हिज्यूअल जाहीराती संदर्भात आतापर्यंत 135 प्री सर्टीफिकेशन जारी करण्यात आले आहेत. यामधील विविध पक्षांच्या 39 अर्जांवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यापैकी 15 बदलांसह पुन्हा सादर करण्यात आले आहेत आणि ती 15 पत्रे बदलांसह पुनर्प्रमाणित आणि जारी करण्यात आली आहेत, उर्वरित अद्याप पुन्हा सादर केलेली नाहीत. त्याऐवजी त्याने पुनरावलोकन पाठवले आहे.
ADVERTISEMENT