Anant Ambani Wedding : अनंत-राधिका यांचे लग्न लावणाऱ्या पंडिताने किती घेतली दक्षिणा?

मुंबई तक

• 04:48 PM • 13 Jul 2024

Anant Ambani Radhika Merchant Wedding : मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला जगभरासह देशातीव सेलिब्रिटी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याची देशापासून विदेशात चर्चा सुरु आहे.

anant ambani radhika merchant wedding pandit chandra shekhar sharma and his fees all about puja service cost

अनंत अंबानीचे लग्न लावणाऱ्या गुरूजीला किती मानधन देण्यात आलं?

follow google news

बातम्या हायलाइट

point

अनंत अंबानीचे लग्न लावणाऱ्या गुरूजीला किती मानधन देण्यात आलं?

point

या विवाह सोहळ्याची देशापासून विदेशात चर्चा आहे.

point

पंडित चंद्रशेखर शर्मा कोण आहेत?

Anant Ambani Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्याला जगभरासह देशातील सेलिब्रिटी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याची देशापासून विदेशात चर्चा रंगली आहे. या लग्न सोहळ्यात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी बक्कळ पैसा खर्च आहे. जेवणाच्या मेन्यूपासून सगळ्याच गोष्टीत अंबानींनी खूप पैसे खर्च केले आहे. त्यामुळे अनंत अंबानीचे लग्न लावणाऱ्या गुरूजीला किती मानधन देण्यात आलं? याची चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे गुरूजींना नेमकं किती मानधन देण्यात आलं हे जाणून घेऊयात. (anant ambani radhika merchant wedding pandit chandra shekhar sharma and his fees all about puja service cost) 

हे वाचलं का?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचे सर्व विधी पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडले आहेत. गुजरातमधील जामनगर येथे झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये चंद्रशेखर शर्माही उपस्थित होते. तसेच चंद्रशेखर शर्मा विमानतळावरून बाहेर पडताना अंबानी आणि मर्चंटच्या टीमने त्यांचे स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पंडित चंद्रशेखर शर्मा कोण आहेत आणि ते किती फी घेतात? हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : Vidhan Parishad election : 'शरद पवारांचेच मत फुटले', जयंत पाटलांच्या पराभवाचे कारण समोर

पंडित चंद्रशेखर शर्मा त्यांच्या फेसबुक हँडलवर अंबानींच्या कार्यक्रमात त्यांच्या उपस्थितीची झलक शेअर करतच असतात. जेव्हा अंबानी कुटुंबाने अँटिलियामध्ये गणेश चतुर्थी उत्सव आयोजित केला तेव्हा त्यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी त्याने मुंबई इंडियन्सच्या कुटुंबासोबतचा फोटोही पोस्ट केला होता. त्यात नीता अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी, अनंत अंबानी आदी दिसले होते. 

पंडित चंद्रशेखर शर्मा हे पर्सनल कोट आणि लाईफ मोटीव्हेटरही आहेत. याची माहिती त्यांच्या फेसबूक वॉलमध्ये मिळते. त्यांची अधिकृत वेबसाईट pujahoma.com नुसार ते एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. जे आपल्या ग्राहकांना अध्यात्माचा मार्ग दाखवतात. त्याच्या कामावरील प्रेमातून जागरुकता आणण्यावर आणि उपचार करण्यावर ते लक्ष केंद्रित करतो. ते इतरांना त्यांची आध्यात्मिक क्षमता कशी वाढवू शकतात हे देखील शिकवतात. ज्योतिषशास्त्रीय आणि पूजा समारंभाच्या सेवांव्यतिरिक्त, पंडित जी आनंदी, निरोगी आणि समृद्ध जीवनासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन देखील करतात. वैवाहिक विधींसाठी पंडित शर्मा हे सामग्रीसह 25 हजार घेत असल्याची माहिती अधिकृत वेबसाईटवरून समोर आली आहे. 

    follow whatsapp