Jasmin Bhasin Health Update : टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) हीचे काहीच दिवसांपूर्वी डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत फोटो व्हायरल झाले होते. यानंतर जस्मिनच्या डोळ्यातील कॉर्निया खराब झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यानच्या काळात तिच्या डोळ्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर आता जस्मिनची हेल्थ अपडेट समोर आली आहे. जस्मिनने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तब्येतीची माहिती दिली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला आहे.
ADVERTISEMENT
जस्मिनच्या डोळ्यातील कॉर्नियाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून आता जस्मिन सावरली आहे. त्यानंतर जस्मिनने शनिवारी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून तब्येतीची माहिती दिली आहे. जस्मिनने तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनला जास्मिन लिहते डोळ्याच्या पट्ट्यांपासून मुक्त झाली असून आता डेंजर झोनच्या बाहेर आली असल्याचे ती सांगते. जास्मिनने यावेळेस डॉक्टरचे देखील आभार मानले आहे. ''माझ्या चेहऱ्यावर हे हास्य परत आणल्याबद्दल धन्यवाद, असे जस्मिनने म्हटले आहे.
हे ही वाचा : Mahendra Thorve : "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष
जस्मिनसोबत नेमकं काय घडलं ?
जस्मिन भसीनने ईटाईम्सशी बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाल ामला जायचे होते. या कार्यक्रमाला जाताना मी लेन्स घातले होते. हे लेन्स घातल्यानंतर अचानक माझे डोळे दुखू लागले होते. तरीही मी कार्यक्रमाला जाण्याचे ठरवले होते. पण नंतर वेदना इतक्या वाढल्या की मला काहीच दिसेनासे झाले होते, असे जास्मिन सांगते.
जास्मिन पुढे म्हणाली, या घटनेनंतर मी लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी यावेळी माझी तपासणी करून कॉर्निया खराब झाल्याची माहिती दिली होती. आणि माझ्या डोळ्यावर पट्टी लावून दिली. या पट्टी लावलेल्या अवस्थेत मुंबईच्या दिशेने निघाले.
मला खूप वेदना होत आहेत. येत्या चार-पाच दिवसांत मी बरी व्हायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण तोपर्यंत मला माझ्या डोळ्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.माझ्यासाठा हे अजिबात सोपे नाही, कारण मी पाहू शकत नाही आणि वेदनांमुळे मला झोपायला अडचण येत असल्याचे जास्मिन भसीन सांगते आहे.
हे ही वाचा : Guru Waghamare : मांडीवर 22 शत्रूंची गोंदवली नावं, पण गर्लफ्रेंडनेच काढला काटा, Inside Story
दरम्यान जस्मिन भसीन, टशन-ए-इश्क आणि दिल से दिल तक यांसारख्या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. ती आता पंजाबी चित्रपट अरदास सरबत दे भले दी मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता ग्रिप्पी ग्रेवाल देखील आहे. हा चित्रपट या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
ADVERTISEMENT