Salman Khan च्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांना कुठे सापडले?

मुंबई तक

16 Apr 2024 (अपडेटेड: 16 Apr 2024, 09:13 AM)

Mumbai Police Arrest 2 Shooters in salman khan house firing case : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन शूटर्संना अटक केली आहे.

लाल घेरे में मौजूद शख्स है विशाल राहुल उर्फ कालू

लाल घेरे में मौजूद शख्स है विशाल राहुल उर्फ कालू

follow google news

बातम्या हायलाइट

point

सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण

point

मुंबई पोलिसांनी दोघांना केली अटक

point

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई

Salman Khan House Firing case : (दिपेश त्रिपाठी, मुंबई) बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली. मुंबई पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. दोन्ही आरोपींना सोमवारी (15 एप्रिल) रात्री गुजरातमधील भूज मध्ये अटक करण्यात आली, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Mumbai police Crime Branch has arrested two accused in the firing incident outside actor Salman Khan's residence)

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भूज येथून अटक केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना पोलीस शोध घेत होते, ते भूज येथे असल्याचे कळताच पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या एका पथकाने गुजरातमध्ये जाऊन दोन्ही आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींना मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करणार आहे.

हेही वाचा >> महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना भूज येथील माता का मढ येथे अटक केली आहे. विकी गुप्ता (वय 24) आणि सागर (वय 21) अशी आरोपींची नावे आहेत.

दोन्ही आरोपी बिहारमधील चंपारण येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शर्टमध्ये दिसलेल्या आरोपीचे नाव सागर आहे, तर टी-शर्ट घातलेल्या आरोपीचे नाव विकी गुप्ता आहे.

अपार्टमेंटच्या बाहेर आढळल्या गोळीबाराच्या खुणा 

रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. दोन्ही तरुण बाईकवर आले आणि गोळीबार करून पळून गेले होते.

हेही वाचा >> भाजपला ओपिनियन पोलमध्ये 'या' राज्यात शून्य जागा, पण PM मोदी म्हणतात... 

दोघांनी हेल्मेट घातले होते. गोळीबाराच्या खुणा सलमानच्या अपार्टमेंटबाहेरील भिंतीवरही सापडल्या आहेत. एक गोळी त्याच्या बाल्कनीच्या जाळीलाही लागली आहे. याच बाल्कनीतून सलमान अनेकदा त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतो. 

गोळीबार केल्यानंतर आरोपी गुजरातमध्ये कसे पोहोचले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणारा शूटर्स गुन्हा केल्यानंतर बाईकवरून वांद्रे येथील माउंट मेरी चर्चमध्ये पोहोचले. बाईक तिथेच सोडली, काही अंतर चालून ऑटोरिक्षा घेऊन वांद्रे रेल्वे स्टेशनला गेले. यानंतर ते बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले, मात्र सांताक्रूझ रेल्वे स्थानकावर उतरून ते बाहेर पडले. या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत होते.

शूटर्सच्या शोधात मुंबई क्राइम ब्रँच राजस्थानमध्ये

मुंबई पोलिसांची गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हल्ल्याचा कट महिनाभरापूर्वी राजस्थानमध्ये रचण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अंतर्गत शूटर्संनी सलमानच्या पनवेल फार्म हाऊसजवळ एक खोली भाड्याने घेतली होती. 

तिथे राहून ते सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर नजर ठेवत होते. सलमान आपल्या मित्र आणि कुटुंबासह अधून मधून तिकडे जात असतो. शूटर्स त्याच्या हालचालीवर नजर ठेवून होते.

हेही वाचा >> 'आता ईडीचे प्रयोग थांबवा', शिंदेंचा नेता भाजपवर इतका भडकला? 

त्यावेळीही अभिनेत्यावर हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. एवढेच नाही तर त्यांनी अनेकवेळा वांद्रे येथील सलमानच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्यांनी चार वेळा सलमानच्या घराची रेकी केली होती. याआधी 2018 मध्येही लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी गॅलेक्सीची रेकी केली होती.

    follow whatsapp