Atul Parchure Death : 'डॉक्टरांनी केलेले चुकीचे उपचार', अतुल परचुरेंसोबत नेमकं काय घडलेलं?

मुंबई तक

• 08:46 PM • 14 Oct 2024

Atul Parchure Death : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. अतुल परचुरे हे कॅन्सरचा सामना करत होते, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.

atul parchure passed away at the age 57 he had cancer diagnosis but get wrong treatment what was the behind story

अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांनी माझ्यावर चुकीचे उपचार केले

point

त्यामुळे माझी प्रकृती ढासळली होती.

point

मुलाखतीत अतुल परचुरेंनी काय सांगितलेल?

Atul Parchure Death : मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. अतुल परचुरे हे कॅन्सरचा सामना करत होते, मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. या निधनानंतर मराठी कलाकारांपासून, नेत्यांपर्यंत आणि प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.असे असतानाचमध्यंतरी परचुरेंनी डॉक्टरांनी माझ्यावर चुकीचे उपचार केल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. त्यामुळे अतुल परचुरेंसोबत नेमकं काय घडलेलं? हे जाणून घेऊयात.  (atul parchure passed away at the age 57 he had cancer diagnosis but get wrong treatment what was the behind story) 

हे वाचलं का?

अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वीच एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, 'जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.'

हे ही वाचा : Shiv Sena UBT: उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया, हृदयात होते ब्लॉकेज...नेमकं काय घडलं?

त्यावेळी अतुल परचुरे म्हणालेले, 'लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त मी कुटुंबीयांसह ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेलो होतो. काही दिवसांनी मला काहीही खाण्यास त्रास होऊ लागला होता. मला मळमळ व्हायची. माझ्या भावाने मला काही औषधे दिली पण उपयोग झाला नाही. त्यानंतर डॉक्टरांनी अल्ट्रासोनोग्राफी केली. मला समजले की, काहीतरी चुकीचं घडतंय. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या यकृतामध्ये सुमारे 5 सेंटीमीटरची गाठ आहे, आणि ती कर्करोगाची गाठ आहे. त्यावेळी मी डॉक्टरला विचारलं की, मी बरा होईन की नाही तेव्हा त्यांनी मी एकदम बरा होईल असं सांगितलं होतं.'

चुकीचे उपचार आणि...

'उपचार सुरू झाले पण त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. चुकीचा आजार जडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. प्रथमच योग्य रोग ओळखू न शकल्याने माझ्या स्वादुपिंडावर विपरीत परिणाम झाला. चुकीच्या उपचारांमुळे माझी प्रकृती सतत खराब होत गेली. मला चालताही येत नव्हते आणि बोलत असतानाही दम लागत होता. त्यानंतर डॉक्टरांनी दीड महिना वाट पाहण्यास सांगितले कारण, शस्त्रक्रियेमुळे कावीळ होण्याची आणि यकृतात पाणी भरण्याची भीती होती आणि त्यात मृत्यूही ओढावू शकत होता. यानंतर मी तात्काळ डॉक्टर बदलले आणि योग्य उपचार घेतले.' असं अतुल परचुरे यांनी सांगितलं होतं.

    follow whatsapp