Mohan Agashe : एका मुलाखतीमध्ये मोहन आगाशेंनी सध्याच्या (Mohan Agashe) राजकारणावर भाष्य केले आहे. राजकारणातील अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडी हे पाहून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 'सध्याचे राजकारण मला खूप त्रासदायक वाटतंय, पुढील पिढीची काळजी वाटते. राजकारणाचा आता धंदा झाला आहे. सगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली', असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
डॉ. मोहन आगाशे यांनी युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं. त्यांच्या या विधानाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'पुढील पिढीसाठी आपण काय सोडून जात आहोत, याकडे कोणी लक्ष देत नाही. कदाचित या वाईटातून चांगलेही घडू शकते. जी अस्वस्थता मी अनुभवत आहे, तशी इतरही अनुभवत असतील. त्यामुळे पुढील पिढी यातून आणखी काही चांगले करेल असा आशेचा किरण आहे.' असं मत त्यांनी व्यक्त केलं.
'राजकारण हा धंदा झाला आहे. त्यामुळे प्रामाणिक राजकारणींना याचा त्रास होत आहे. एखाद्या व्यवसायात समाजभान विसरलेले धंदेवाईक लोक शिरली की त्या क्षेत्राचे नुकसान होते.' असंही डॉ.मोहन आगाशे पुढे म्हणाले.
त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच त्यांचा 'लोकशाही' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसंच, अभिनेत्री तेजश्री प्रधान, अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे हे अभिनेतेही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास आणि या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं या चित्रपटात उलगडण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT