सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये होणार मैत्रीचं सेलिब्रेशन

मुंबई तक

• 08:03 AM • 28 Jul 2021

सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. आता पर्यंत अनेक लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ द वीकचा खिताब देखील मिळाला […]

Mumbaitak
follow google news

सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ नवं पर्व नुकतंच सुरू झालं. पाहता पाहता हे १४ ही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात. यांच्या उत्तम परफॉर्मन्सने प्रेक्षक आणि पंचरत्न देखील मंत्रमुग्ध होतात. आता पर्यंत अनेक लिटिल चॅम्प्सना गोल्डन तिकीट मिळालं असून अनेकांनी परफॉर्मर ऑफ द वीकचा खिताब देखील मिळाला आहे.लवकरच आपण सर्वजण फ्रेंडशिप साजरा करणार आहोत, त्यामुळे सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या सेटवर देखील दोस्तीयारीचा जल्लोष होणार आहे. या विशेष भागासाठी सारेगमपमधील काही स्पर्धक या मंचावर येणार आहे. जुईली जोगळेकर, शमिका भिडे, सागर फडके, अवंती पटेल आणि शाल्मली सुखटणकर हे पुन्हा एकदा सारेगमपच्या मंचावर आपल्या सुरांची जादू पसरवण्यासाठी सज्ज होणार आहेत. यांच्यासोबत पंचरत्न आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतील. या विशेष भागाची सुरुवात पंचरत्न आणि या स्पर्धकांच्या एका धमाकेदार सादरीकरणाने होणार आहे. या भागात लिटिल चॅम्प्स देखील दमदार परफॉर्मन्सेस सादर करणार आहेत. धमाल, मजा, मस्तीने रंगलेल्या या भागात रव्याचा लाडू म्हणजेच स्वरा जोशी लिटिल चॅम्प्स मधील काही स्पर्धकांची नक्कल करणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp