अभिनेत्री विशाखा सुभेदारने नेहमीच आपली चांगली छाप पाडलीये. मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आता निर्माती बनणार आहे. विशाखा सुभेदार अणि पूनम जाधव ‘प्रग्यास क्रिएशन्स’ या नाट्य संस्थेच्या माध्यमातून नाट्यनिर्मिती क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत आहेत. त्यामुळे आता अभिनयानंतर निर्मिती क्षेत्राकडे विशाखाचा नवा प्रवास सुरु होणार आहे.
ADVERTISEMENT
लवकरच रंगभूमीवर प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही.आर. प्रोडकशन्स ह्या नाट्यसंस्थेचं ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक येतंय. 16 फेब्रुवारी रोजी या नाटकाचा मुहूर्त पार पडला. या नाटकाचं लिखाण तसंच दिग्दर्शन प्रसाद खांडेकर यांनी केलंय.
‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकात सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे तसंच नम्रता संभेराव हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचं संगीत अमिर हडकर तसचं नेपथ्यची जबाबदारी संदेश बेंद्रे यांना सोपवण्यात आली आहे. याचसोबत नाटकाचे सूत्रधार आघाडीचे व्यवस्थापक गोट्या सावंत असणार आहेत.
एप्रिल महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला खळखळून हसवणारे हे कलाकार रंगभूमीवर काय जादू करणार आहेत याची उत्सुकता आहे.
‘लोकासांगे ब्रह्मज्ञान’ या नाटकापासून विशाखाने तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. या नाटकानंतर जाऊ बाई जोरात, मी कात टाकली तसंच एक डाव भटाचा या नाटकांमध्येही विशाखाने भूमिका साकारल्या होत्या. मात्र आता अभिनयानंतर निर्माती या नव्या इनिंगला विशाखा सुरुवात करतेय.
ADVERTISEMENT