The kerala story बॉक्स ऑफिसवर सुसाट! दोनच दिवसांत कोट्यवधींची कमाई

मुंबई तक

07 May 2023 (अपडेटेड: 07 May 2023, 01:30 PM)

The Kerala story Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala story) स्टारर अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah sharma) सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलाय. शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने दोनच दिवसात तब्बल 19.25 करोडचा गल्ला जमवला आहे.

adah sharma starer the kerala story box office collection

adah sharma starer the kerala story box office collection

follow google news

The Kerala story Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala story) स्टारर अभिनेत्री अदा शर्माच्या (Adah sharma) सिनेमाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातलाय. शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने दोनच दिवसात तब्बल 19.25 करोडचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर जर आजचा दिवस पाहिला, तर रविवारच्या दिवशी देखील हा सिनेमा मोठा गल्ला जमावण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता हा सिनेमा रविवारी किती कोटीचा गल्ला जमवतो, हे पाहावे लागणार आहे. (adah sharma starer the kerala story box office collection two days collection reach 19.25 crore rupees)

हे वाचलं का?

‘द केरळ स्टोरी’ (The Kerala story) या सिनेमाने शुक्रवारी 5 मे रोजी रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर (Box Office) धुमाकुळ घातला. सिनेमाने पहिल्याच दिवशी 8.03 करोडचा गल्ला जमवला. तर शनिवार 6 मे रोजी देखील या सिनेमाने चांगली कमाई केली. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी चांगला प्रतिसाद होता. ‘द केरळ स्टोरी’ने शनिवारी 11.22 करोडचा गल्ला जमावला. म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा 3 करोड जास्त गल्ला दुसऱ्या दिवशी सिनेमाने कमावला.

हे ही वाचा : The Kerala Story : बलात्कार, आत्महत्या अन् शिरच्छेद… सीन कसे झाले शूट?

दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ

बॉक्स ऑफीसच्या रिपोर्टनुसार, ‘द केरळ स्टोरी’ने शनिवारी 11.22 करोडचा गल्ला जमावला. एकूणत दुसऱ्या दिवशी कमाई 40 टक्के वाढली. ही वाढ पाहता हा सिनेमा पुढच्या आठवड्यातही बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करू शकेल, असा अंदाज आहे. आता रविवारचा दिवस अनेकांसाठी सुट्टीचा असणार आहे. या दिवशी चित्रपट गृहात हा सिनेमा पाहण्यासाठी मोदी गर्दी उसळणार आहे. त्यामुळे रविवारचा दिवस देखील सिनेमासाठी रेकॉर्ड ब्रेक असण्याची शक्यता आहे. तसेच जर रविवारी सिनेमाची क्रेझ कायम राहिली तर पहिल्या आठवड्यात ‘द केरळ स्टोरी’ 35 ते 37 करोड रूपयांची कमाई करण्याची शक्यता आहे.

”द केरळ स्टोरी” विरूद्ध ”द काश्मिर फाईल्स”

द केरळ स्टोरी सिनेमाने दोनच दिवसात नेट इंडियात 20 करोडची कमाई केली. सिनेमाच्या कथानकामुळे झालेला वाद आणि राजकारणामुळे या सिनेमाची तुलना अनुपम खेर स्टारर द काश्मिर फाईल्सशी होते. द काश्मिर फाईल्स पहिल्या दिवशी 3.55 करोड कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 8.50 करोडचा गल्ला जमवला होता. याचा अर्थ विवेक अग्निहोत्रीच्या सिनेमाने तब्बल 140 टक्के वाढ घेतली होती. द केरळ स्टोरीने दोनच दिवसात द काश्मिर फाईल्यपेक्षा जास्त कमाई केली होती.पण दोन्ही सिनेमाच्या ग्रोथमध्ये खुप अंतर आहे.

हे ही वाचा : ‘The Kerala Story’ चित्रपटावर बंदीची मागणी, नव्या वादाला फुटणार तोंड?

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा सिनेमा असलेला ‘द केरळ स्टोरी’ 5 मे रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात बॉलिवुड अभिनेत्री अदा शर्मा मु्ख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची खुप चर्चा आहे.

    follow whatsapp