2020मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड सिनेमे थिएटर बंद असल्याने रिलीज होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता 2021 मध्ये अनेक मोठे सिनेमे बॉक्सऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भूल भुलैय्या 2 या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा आडवाणी स्टारर असलेला हा सिनेमा 19 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचं शूटींग कोरोनामुळे थांबण्यात आलं होतं. तर 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैय्या या हॉरर कॉमेडी सिनेमाचा हा सिक्वेल आहे.
ADVERTISEMENT
तर भुल भुलैय्या 2 नंतर रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित 83 हा सिनेमा देखील यावर्शीच रिलीज होणार आहे. नुकतंय या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून 4 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीरने सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर आणि तारिख शेअर केली आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारेही झळकणार आहे. 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित हा सिनेमा आहे.
अमिताभ बच्चन यांचा बहुचर्चित ‘झुंड’ सिनेमा रिलीज होण्यासाठी तयार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं असून हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा आहे. येत्या 18 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. अमिताभ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय या चित्रपटाला अजय आणि अतुलने संगीत दिलं आहे.
तर स्त्री सिनेमानंतर राजकुमार राव, जान्हवी कपूर आणि वरूण शर्मा यांचा रूही हा सिनेमा पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. 11 मार्च रोजी रूही हा हॉरर कॉमेडी थिएटरमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तर “भूतिया शादी में आपका स्वागत है” असं कॅप्शन देत ‘रुही’ सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आलंय.
ADVERTISEMENT