वादग्रस्त पण प्रचंड प्रसिद्ध असलेल्या बिग बॉसच्या 17 व्या सीझनची रविवारी (१५ ऑक्टोबर) धमाकेदार सुरूवात झाली. सलमान खानने भारतातील सर्वात मोठा आणि हिट रिअॅलिटी शो बिग बॉस 17 च्या पर्वाची सुरूवात केली. बिग बॉस 17 चा प्रीमियर नेहमीप्रमाणेच भव्य दिव्य होता. या वेळी या कार्यक्रमात कलाकार आणि युट्युबर्संनी धमाल केली. क्राइम रिपोर्टिंगपासून वकिलीपर्यंतच्या फ्लेवर्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. (Bigg Boss 17 started as usual with the performance of Salman Khan. After this, Dabangg Khan introduced all the housemates one by one.)
ADVERTISEMENT
बिग बॉस 17 ची सुरुवात नेहमीप्रमाणे सलमान खानच्या परफॉर्मन्सने झाली. यानंतर सलमान खानने घरातील सर्वांची ओळख करून दिली. यावेळी हा शो कपल विरुद्ध सिंगल या थीमवर आधारित आहे. या शोमध्ये टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध जोडपे सहभागी झाले आहेत, ज्यांनी प्रीमियरच्या रात्री चाहत्यांना त्यांच्या केमिस्ट्रीची झलक दाखवली.
प्रीमियर नाईटला कोण ठरलं भारी?
प्रीमियर नाईटमधील स्पर्धकांच्या एन्ट्रीवरून बिग बॉसमध्ये कोण सर्वाधिक मनोरंजन करणार आणि कंटाळवाणे होणार आहे, हे स्पष्ट झाले. बिग बॉस 17 च्या स्पर्धकांबद्दल सांगायचे, तर मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी, सनी आर्या, ऐश्वर्या शर्मा, अंकिता लोखंडे यांनी प्रीमियरच्या रात्री त्यांच्या खोडकर आणि नखरेबाज शैलीने छाप सोडली. दुसरीकडे नील भट्ट, रिंकू धवन, फिरोजा खान, सना रईस खान थोडे गोंधळलेले आणि निरुत्साही असल्यासारखे दिसले.
हेही वाचा >> बॉयफ्रेंडचा तिला पाहायचा होता लाईव्ह मर्डर, हत्येनंतर गोव्यात होती पार्टी
प्रीमियर नाईट राहिली कंटाळवाणी
शोची सुरुवात चांगली झाली. पण यावेळी स्पर्धकांची एंट्री बिग बॉसच्या मागील सीझनप्रमाणे मनोरंजक नव्हती. अनेक स्पर्धकांच्या प्रवेशाने प्रेक्षकांना कंटाळा आला. पण इशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील भांडणामुळे प्रीमियरच्या रात्रीच शो चा पारा चढला आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीन सोडता आली नाही.
या स्पर्धकांच्या एन्ट्रीने केली हवा
‘तहलका भाई’ म्हणजेच सनी आर्याची एंट्रीही मनोरंजक ठरली. स्पर्धकाच्या पत्नीने स्टेजवर थट्टा मस्करी करीत वातावरणनिर्मिती केली. याशिवाय अंकिता लोखंडेचा पती विकी जैनसोबतच्या सात वचनानेही चाहत्यांचे मनोरंजन केले. अर्धे ब्रिटिश, अर्धे इराणी नावेद सोल आणि मुनावर फारुकी यांनी आपल्या एंट्रीने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डोस दिला.
बिग बॉसच्या इतिहासात या गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या
शोमध्ये पहिल्यांदाच 3 स्वतंत्र घरे बांधण्यात आली आहेत. घर क्रमांक 1 हृदय आहे, घर क्रमांक 2 मेंदू आहे आणि घर क्रमांक 3 शक्ती आहे. घर क्रमांक 1 मध्ये फोनची सुविधाही देण्यात आली आहे. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच घरात फोन ठेवण्यात आला आहे. मनापासून खेळणाऱ्यांना थेरपी आणि वैयक्तिक स्नानगृह देखील मिळणार आहे. येथे एक संग्रहण कक्ष देखील आहे, जिथे स्पर्धकांना सर्व काही मिळेल. एकूणच, बिग बॉस 17 चा भव्य प्रीमियर लव्ह, हेट, फाईट्स आणि मजा मस्ती यांनी भरलेला होता.
हेही वाचा >> 1.5 कोटी कमावलेल्या पुण्यातील PSI ची लागली वाट, ऑनलाइन गेमिंगमुळेच झाला ‘गेम’
प्रीमियर नाईटनंतर सध्या सोशल मीडियावर फक्त मुनवर फारुकी ट्रेंड करत आहे. आता या खेळात कसब कोण दाखवते, हे येत्या काळातच कळेल. असो, पण यावेळच्या खेळातील तुमचा आवडता स्पर्धक कोण आहे?
ADVERTISEMENT