बॉलिवडूमधील भट्ट आणि कपूर दोन महत्त्वाच्या कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न दोन अवघ्या दिवसांवर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विवाहसोहळ्याची चाहत्यांनाही उत्सुकता असून, आलिया-रणबीरच्या मेहंदी, संगीत सोहळ्यासह लग्नाची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच विवाहबद्ध होणार असून, वांद्रेतील घरात हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आलिया-रणबीरने बिल्डिंगमध्ये हॉल बुक केला असून, सध्या या हॉलची सजावट करण्याचं काम सुरू आहे.
Alia-Ranbir wedding : आलिया भट्ट-रणबीर कपूर १५-१६ एप्रिल नव्हे, तर ‘या’ दिवशी करणार लग्न
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा प्री-वेडिंग समारंभही खास असणार आहे. आलिया आणि रणबीर यांचा संगीत समारंभ आणि मेहंदी सोहळा आरके स्टुडिओमध्ये पार पडणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ एप्रिल रोजी मेहंदी सोहळा होणार आहे. त्यानंतर १४ एप्रिल रोजी हळदी समारंभ असणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी हळदी समारंभ आणि सायंकाळी संगीत सोहळा होणार आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नासाठी आरके स्टुडिओची सजावट आधी करण्यात आली आहे. स्टुडिओमध्ये अधिकची सुरक्षा तैनात करण्याबद्दलची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्टुडिओमध्ये कुणालाही परवानगीशिवाय जाण्याची परवानगी असणार नाही.
आलिया भट्टचा भाई राहुल भट्टने लग्न सोहळ्याबद्दलची काही माहिती दिली आहे. आलिया-रणबीरच्या लग्नात केवळ २८ पाहुणेच हजर असणार आहे. सर्व लोक कुटुंबातीलच असणार आहेत. हे सर्व लोक चेंबूर पर्यंत बसने जाणार आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.
राहुल भट्ट, महेश भट्ट आणि किरण भट्टचा मुलगा आहे. पूजा भट्ट राहुलची मोठी बहीण असून, आलिया महेश भट्ट आणि त्यांची दुसरी पत्नी सोनी राजदान यांची मुलगी आहे.
ADVERTISEMENT