अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची उत्सुकता अखेर संपली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटातील लूकची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पठाण कधी प्रदर्शित होणार याकडे सिनेरसिकांचं लक्ष होतं. अखेर बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता शाहरूख खानने ट्विट करत उशीर झालाय, पण तारीख लक्षात ठेवा असं म्हणत घोषणा केली.
ADVERTISEMENT
शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पठाण सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजेच २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना टीजर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर तारीख लक्षात ठेवा असंही म्हटलं आहे.
शाहरुख ट्विटमध्ये म्हणतो, “मला माहितीये की खूप उशिर झाला आहे, पण तारीख लक्षात ठेवा. पठाणची वेळ सुरू होतेय. २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात भेटू.”
शाहरुख खानचा पठाण चित्रपट एकाच वेळी तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानने त्यांच्या ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे. शाहरुख खानच्या पठाणमधील लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासूनच चित्रपटाची चर्चा सुरू होती.
ADVERTISEMENT