दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोणने अनेक हीट सिनेमे दिले आहेत. संजय आणि दीपिका यांचे बाजीराव मस्तानी तसंच पद्मावत या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर तूफान कमाई केली होती. तर आता गंगूबाई काठियावाडी सिनेमासाठी संजय यांनी अभिनेत्री आलिया भट्टची निवड केली.
ADVERTISEMENT
तर गंगूबाई काठियावाडी सिनेमात आलियाची वर्णी लागल्याने दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळी यांच्याशी नाराज असल्याची चर्चा आहे. या सिनेमात भन्साळींनी दीपिकाला एक डान्स नंबर ऑफर केला होता. मात्र दीपिकाने याला नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी आणि दीपिका यांच्यात सर्व काही ठीक आहे. दोघांचीही बाँडिंग चांगली असून ते प्रोफेशनलही आहे.
दीपिकाने संजय लीला भन्साळींसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. दरम्यान गंगूबाई काठियावाडी सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांनी दीपिकाला हा रोल ऑफर केलाच नव्हता. या भूमिकेसाठी त्यांची पसंती पहिल्यापासून आलिया भट्टला होती. त्यामुळे आलिया भट्ट या सिनेमाच्या लीड रोलमध्ये आहे.
तर यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही एका चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यासोबत ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या सिनेमातही ती झळकणार आहे. शिवाय दीपिका आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ सिनेमाही यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचप्रमाणे रणवीर सिंगच्या 83 सिनेमामध्ये तिची छोटीशी भूमिका असणार आहे.
ADVERTISEMENT