महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर सागर कारंडे सध्या झी युवावरील लोकप्रिय मालिका डॉक्टर डॉन मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत सागर विक्रांत ही भूमिका साकारतोय. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सागर कारंडे म्हणाला गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर डॉन या मालिकेत कॉलेजचे नवीन डीन विक्रांत यांच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे. विक्रांत हा खूप मनमिळावू आणि प्रेमळ आहे, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो, तो विद्यार्थ्यांना देखील मित्रासारखं वागवतो. त्याचा मोनिकावर खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच तो आता भारतात परत आला आहे. एकाच व्यक्तिरेखेच्या अनेक छटा सादर करण्याची संधी मला विक्रांत साकारताना मिळाली आहे. खूप वर्ष कॉमेडी केल्यानंतर कलाकाराला नेहमीच काहीतरी वेगळं करायची इच्छा असते आणि मी नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या शोधात असतो. याआधी मी काही मालिकांमध्ये गेस्ट एपियरन्स केलं आहे. ४ – ५ भागांसाठी ती व्यक्तिरेखा असून तिची सुरुवात व शेवट मला माहिती असतो. पण इथे डॉक्टर डॉन मध्ये मला विक्रांतची सुरुवात कळली आहे, त्याचा शेवट काय असणार आहे हे प्रेक्षकांप्रमाणेच माझ्यासाठी देखील सरप्राईज असणार आहे.
ADVERTISEMENT
विक्रांतची भूमिका मला साकारायला मिळाली याबद्दल मी खूप आनंदी आहे. ही भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे आणि मला ती साकारताना खूप मजा येतेय. माझा नेहमीच अट्टाहास असतो कि या आधी मी केलेल्या भूमिकांप्रेक्षा वेगळं काही तरी मी करावं. एखादी नवीन भूमिका साकारायला मिळत असेल तर मी त्यासाठी वेळ हा काढतोच. चला हवा येऊ येऊ द्या मध्ये मी कॉमेडी करत असलो तरी देखील कलाकार म्हणून काहीतरी नवीन करण्याची भूक ही माझ्यामध्ये आहे आणि आपल्याला काही नवीन करता येईल का? या प्रश्नाचे उत्तर आणि आपल्यातील अभिनय कौशल्याला वाव देण्याची संधी मला विक्रांतमुळे मिळाली. डॉक्टर विक्रांत साकारणं आव्हानात्मक आहे पण मी त्या व्यक्तिरेखेची मजा घेऊन साकारतोय त्यामुळे ते आव्हान कठीण नाही वाटत आहे. सेटवर आम्ही सगळेच खूपच धमाल करतो. श्वेता सोबत माझं ट्युनिंग खूप छान आहे. देवदत्त सोबत मी पहिल्यांदाच काम करतोय पण खूपच कमी वेळात आमचं ट्युनिंग खूप छान जमलंय. मालिकेचे १०० भाग पूर्ण झाल्या नंतर माझी एंट्री होतेय त्यामुळे हे सर्व कलाकार मला शूटिंग दरम्यान खूप मदत करतात. मला ही काही शंका असतील तर मी त्यांना निसंकोचपणे विचारतो. आमचं ट्युनिंग खूप चांगलं असल्यामुळे सेटवर खेळीमेळीचं वातावरण असतं.-
विक्रांतची व्यक्तिरेखा खूपच रोमँटिक आहे आणि तो मोनिकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. माझी पत्नी माझं मालिकेतील काम आवर्जून बघतेय.हा खूप विनोदी भाग आहे कि माझ्या पत्नीच्या मैत्रिणी मालिका बघून तिला सांगतात विक्रांत किती रोमँटिक वागतोय त्यावर माझी पत्नी मला घरी बोलते कि तुम्ही मालिकेप्रमाणे घरी पण थोडे वागा. हीच प्रेमातील गम्मत आहे. माझं तिच्यावर अतिशय प्रेम आहे पण ते मला व्यक्त करता येत नाही. पण ती ही तिची प्रामाणिक तक्रार मला अगदीच मान्य आहे.मी विक्रांत साकारताना माझे १००% देणार आहे. बऱ्याच वेळाने प्रेक्षक मला एका वेगळ्या भूमिकेत बघतील त्यामुळे मी त्यांना देखील माझी ही नवीन भूमिका नक्की आवडेल अशी मी आशा करतो. प्रेक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.
ADVERTISEMENT