ADVERTISEMENT
अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप तिच्या आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलत असते. फक्त वैयक्तिक आयुष्यबद्दलच सांगत नाही, तर आलिया कश्यप तिचे अनुभवही तिच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्संना सांगत असते.
आलिया कश्यपने आता असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर होणारा त्रास, पॉर्न चित्रपट बघण्याची सवय यासह विविध गोष्टींबद्दल सांगितलं आहे.
आलिया खूप काळापासून युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत असते. वेगवेगळ्या विषयावरील तिचे व्हिडीओ बघून आलिया कश्यपचे चाहते तिला प्रश्न विचारत असतात, तसेच त्यांच्या प्रश्नांवर व्हिडीओ बनवायलाही सांगत असतात.
एका चाहत्याने आलियाला विचारलं की, तिला कसे लोक आवडतात? त्यावर आलिया कश्यप म्हणाली होती की, गर्विष्ठ लोक तिला अजिबात आवडत नाही. जर कुणी इतर व्यक्तीसोबत वाईट वर्तणूक करत असेल, तर तेही तिला आवडत नाही. फसवणूक करणंही आलियाला आवडत नाही.
आलिया कश्यपला तिच्या एका चाहतीने पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर रक्त येण्याबद्दल विचारलं. त्यावर आलिया कश्यपने उत्तर दिलं.
आलिया म्हणाली, ‘माझ्याबाबतीत असं झालं नव्हतं. ही बाब खूप सर्वसामान्य आहे. पहिल्यांदा सेक्स करताना हायमेन (योनीमध्ये एक पडदा असतो ज्याला हायमेन म्हणतात.) तुटतो, त्यामुळे रक्त येतं.’ माझ्या काही मैत्रिणींनाही असा अनुभव आला होता, असंही आलियाने सांगितलं.
रिलेशनशिपमध्ये असताना निर्माण होणारी असुरक्षितता आणि शंका हे कसं हाताळते,याबद्दलही आलियाने या व्हिडीओत उत्तर दिलंय. भूतकाळातील नात्यांमुळे आपल्या मनात शंका आणि असुरक्षितता निर्माण होते, पण याबद्दल तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत बोललं पाहिजे, असं ती म्हणाली.
आलियाने सेक्सबरोबरच हस्तमैथुनाबद्दलही या व्हिडीओत माहिती दिलीये. हस्तमैथुन आरोग्यदायी आणि आवश्यक आहे. विशेषतः मुलींसाठी. हस्तमैथुनामुळे तुम्ही तुमच्या शरीराविषयी जाणून घेता, असं ती म्हणाली.
आलिया कश्यपला एका फॉलोअर्संने पॉर्न बघण्याची सवय लागणं चांगल आहे का? असं विचारलं. त्यावर ती म्हणाली, ये बरोबर नाही. पॉर्न बघणं ठिक आहे, पण त्यातून तुमच्या मनात खोट्या आशा निर्माण होतात. पूर्वी मी सुद्धा बघायचे. त्यामुळे मी खूप त्रस्त झाले होते. आता पॉर्न फिल्म बघत नाही, असं ती म्हणाली.
ADVERTISEMENT