Shahrukh Khan: शाहरुख खान आणि गौरी (Gauri Khan) ही चित्रपटसृष्टीतील एक वेगळी जोडी म्हणून वेगळी आहे. त्यामुळेच ही दोघंही सोशल मीडियावर (Social Media) त्यांचे प्रेम (Love) व्यक्त करायला कधीही संकोच करत नाहीत. मग त्यामध्ये त्या दोघांचे फोटो शेअर (Photo Share) करणं असो की, चेष्टामस्करीत एकमेकांची खेचणे असो या सगळ्या गोष्टी ही दोघं अगदी आनंदाने शेअर करतात.
ADVERTISEMENT
गौरी-शाहरुखच्या लग्नाला विरोध
शाहरुख खान आणि गौरीच्या लग्नाला आता तीस वर्षे होऊन गेली आहेत. त्या दोघांनी लग्नगाठ बांधल्यापासून दोघांचीही ध्येयं ती एकच ठेवत असताता. मात्र, एक काळ असा होता जेव्हा गौरीचे कुटुंबीय त्यांच्या लग्नाच्या विरोधात होते. ही जुनी आठवण आता शाहरुखच्या 58 व्या वाढदिवसानिमित्ताने अनेक जण आता शेअर करत आहेत. गौरी खान हिने 2008 मध्ये एक गोष्ट सांगितली होती. ती आठवण होती. त्यांच्या लग्नाआधीची, कारण त्यावेळी गौरीच्या घरातील अनेकांनी त्यांच्या लग्नाला विरोध दर्शवला होता, तर गौरी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती.
हे ही वाचा >>कुणबी प्रमाणपत्र आणि OBC आरक्षण, जरांगे-पाटलांची नेमकी मागणी काय? जाणून घ्या 10 प्रश्नांची उत्तरं
धर्मापेक्षा मानवता ग्रेट
गौरीने आपल्या लग्नाबद्दल ती गोष्ट सांगताना म्हटले होते की, माझ्या पालकांना आंतरधर्मीय विवाह करणं ही गोष्ट पटवून सांगणे खूप कठीण होते, आणि ते माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. कारण होता शाहरुखचा धर्म आणि चित्रपटसृष्टीत करिअर करणं हे त्याचं स्वप्न होतं. कारण ही परिस्थिती माझ्या पालकांनी सहज स्वीकारणं सहज शक्य नव्हते. त्यामुळेच त्याकाळी गौरीने एक निर्णय घेतला होता, तो म्हणजे त्या दोघांनी शाहरुख खानचे नाव बदलून अभिनव नाव ठेवण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता.
‘ते’ कारण मूर्खपणाचं
शाहरुखचे नाव अभिनव ठेवले तर तिला शाहरुख हा हिंदू कुटुंबातील आहे हे पटवून देणं सोपं होतं. मात्र ज्यावेळी ही आठवण आता गौरी सांगते तेव्हा तिला वाटतं, ते कारण सांगितलं असतं तर ते मूर्खपणाचे झाले असते. ते कारण बालिशही वाटले असते.
आंतरधर्मिय विवाहाची गोष्ट तिने सांगितली तेव्हा तिने हे ठरवले होते की आता दोन्ही धर्मातील गोष्टींचा तेवढाच आदर करायचा. तेवढ्याच आनंदाने दोन्ही धर्मातील अनेक उत्सव तेवढ्याच मजेत साजरे करायचे. त्यावेळी ती हेही सांगते की आंतरधर्मिय विवाहामुळे माझ्या मुलांना एक वेगळा अनुभव मिळतो.
मानवता हाच खरा धर्म
शाहरुख खानने 2013 साली दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या मुलांना मी धर्माची ओळख करुन देण्याआधी त्यांना सांगतो की, सगळ्यात आधी आपण भारतीय आहोत. आणि त्यांची पहिली पसंदी ही धर्मापेक्षा त्यांनी मानवता हाच खरा धर्म मानायला पाहिजे असं तो आपल्या मुलांना सांगतो.
इन्सान की औलाद
शाहरुख खानने धर्माची गोष्ट सांगताना त्याने एकदा स्वतः गाणं गात होता. त्यावेळी त्याने गाणे म्हटले होते की, ‘तू हिंदू बनेगा ना मुस्लिम बनेगा –इन्सान की औलाद है इन्सान बनेगा’. हे गाणं म्हणण्यापाठीमागे त्याचा हेतू हा होता की, जिथं आपण राहतो तिथं बंधुत्वाची भावना रुजवणं.
ADVERTISEMENT