एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखादा फोटो फोटोशॉप करणे हे काही आता नवीन राहिलेलं नाही. एखादा फोटो फोटोशॉप करून एखाद्या ब्रँण्डच्या जाहिरातीत,प्रोडक्टमध्ये सर्रास वापरले जातात. हे असे अगदी अचूक फोटोशॉप केलेले फोटो त्या ब्रँण्डची प्रतिमा गुणवत्ता अनेक पटीने वाढवू शकतात.मात्र त्यासाठी हे फोटो उत्तमरित्या फोटोशॉप केलेले असावे लागतात. परंतु जर हे फोटोशॉप केलेले फोटो योग्यरित्या वापरले नाही तर काय मोठी फजिती होते ह्याचं उत्तम उदाहरण नुकतंच सगळ्यांसमोर आलं. अमिताभ बच्चन आणि मराठी अभिनेत्री पूजा सावंत असलेल्या दागिन्याच्या जाहिरातीत नेमके हेच घडले.
ADVERTISEMENT
या दागिन्याच्या जाहिरातीत अमिताभ बच्चन आणि पूजा सावंत अतिशय उत्तम पेहरावात एकमेकांसोबत पोज देताना आपल्याला दिसून येतात.यात मुलीच्या लग्नानंतर तिचे वडिल तिच्या खांद्यावर हात ठेवून पोज देतानाचं चित्रण करण्यात आलं आहे. इथे वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन आणि मुलीच्या भूमिकेत पूजा सावंत आहे. मात्र पूजा सावंतच्या खांद्यावर असलेला अमिताभ बच्चन यांचा लांब हात पाहून नेटिझन्सनी यावर खिल्ली उडवायला सुरवात केली आहे.
हा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कारण या फोटोतील अमिताभ बच्चन यांच्या हाताची लांबी प्रचंड लांब दाखवण्यात आली आहे. आणि हा हात फोटोशॉप केलेला आहे असं सरळसरळ लक्षात येत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी आपल्या अंदाजात चांगलाच समाचार घेतला आहे.एकाने लिहलं की या फोटोतील डँडींचे हात जरा जास्तच लांब आहेत. फोटोमधली मॉडेल फिल्म स्टार नाही. त्यामुळे बीग बिंना तिच्यासोबत कदाचित पोज द्यायची नसेल.
ट्विटरवर या फोटोला १६०० हून जास्त लाईक्स मिळालेत आणि अनेक लोकांनी या फोटोला शेअर करत व्हायरल केलं आहे. अनेकांच्या यावरील विनोदी प्रतिक्रियांनीही लक्ष वेधून घेतलं आहे.तर काहींना मराठी अभिनेत्री पूजा सावंतबद्दल माहिती नसलेल्यांनाही सुनावलं आहे. एका यूजरने म्हटलं आहे की जाहिरातीतील महिला ही पूजा सावंत आहे आणि ती मराठीमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एका यूजरने तर उत्कृष्ट निरीक्षण अशी टिपणी केली असून एकाने हे अत्यंत विचित्र दिसतंय असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT