सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत देखील वाढ होतेय. काही बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहेत. तर अशातच मंगळवारी सोशल मीडियावर गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. दरम्यान आज लकी अली यांनी स्वतः पोस्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
ADVERTISEMENT
यासंदर्भात लकी अली यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये ते म्हणतात, “सगळ्यांना नमस्कार, सध्या सोशल मीडियावर माझ्या निधनाच्या अफवा सुरु आहेत. त्यावर मला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मी जिवंत आणि घरी आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण देखील काळजी घेत आहात. तसंच सुरक्षित आहात.’
मंगळवारी लकी अली यांचं कोरोनामुळे निधन झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यानंतर एकाने त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली देखील वाहिली. मात्र या सर्व अफवा असून लकी अली सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिलीये.
दरम्यान यापूर्वी कालच लकी अली यांच्या मैत्रिण नफीसा अलीने ट्वीट करत या सर्व अफवा असल्याचं सांगितलं होतं. नफिसा ट्विटमध्ये म्हणाल्या की, “लकी एकदम ठीक असून आमचं दुपारी बोलणं झालं. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती उत्तम आहे.”
ADVERTISEMENT