ADVERTISEMENT
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्री साठी एक विक पॉईंट मानला जातो.
या नियमाला मराठी अभिनेत्रीही अपवाद नाहीत…आणि त्यात साडी जर पैठणी असेल तर मग महिला वर्गाच्या आनंदाला पारावारच उरत नाही.
अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने पारंपरिक पैठणी साडीत आपलं खास फोटोसेशन केलं आहे.
या फोटोशूटमध्ये प्रार्थनाच्या पैठणीचा रंग आणि फोटोग्राफरने वापरलेली रंगसंगती ही अप्रतिम खुलून आली आहे.
प्रार्थनाच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
पैठणीला साजेश्या दागिन्यांमुळे प्रार्थनाच्या या फोटोसेशनला चार चाँद लागले आहेत.
पैठणी साडीतला प्रार्थनाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरला आहे.
या फोटोसेशनमध्ये प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे.
सध्या प्रार्थना झी मराठी वाहिनीवरच्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे.
या मालिकेत प्रार्थनासोबत अभिनेता श्रेयस तळपदेही प्रमुख भूमिकेत आहे. नेहा आणि यश या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
मराठी मालिका आणि त्यानंतर चित्रपटांमधून करिअरला सुरुवात केलेल्या प्रार्थनाने फार कमी काळात प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.
प्रार्थना सोशल मीडियावरही नेहमी सक्रीय असते.
तिच्या प्रत्येक फोटोसेशनला चाहते भरभरुन पसंती देत असतात
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्रार्थनाचा हा सदाबहार अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT