ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पावनखिंड हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबतच्या मावळ्यांनी पावनखिंडीत केलेल्या पराक्रमावर हा सिनेमा आधारित आहे, ज्यात प्राजक्तानेही एक भूमिका साकारली आहे.
या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्यामुळे प्राजक्ता चांगलीच खुश झाली आहे. याबद्दल तिने प्रेक्षकांचे खास आभार मानले आहेत.
पावनखिंड सिनेमाला लोकांची गर्दी पाहून काही ठिकाणी हिंदी सिनेमे काढून पावनखिंड सिनेमाला जागा देण्यात आल्याचं प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय.
IMDB ने या सिनेमाला ९.८ असं रेटींग दिलं आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्राजक्ताने नाकात नथ, नेकलेस आणि साडी नेसून खास फोटोशूट केलं.
तिचा हा मराठमोळा साज प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस उतरला आहे.
काय मग, तुम्ही कधी पाहताय प्राजक्ताचा हा नवीन सिनेमा? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT