गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड फार चर्चेत आली होती. तर आता पुन्हा तिच्या एका व्हीडियोमुळे प्राजक्ता चर्चेत आली आहे. प्राजक्ताचा हा व्हीडियो जुना आहे मात्र सध्या तो सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झालाय. या व्हीडियोमध्ये प्राजक्ता साडी नेसून वर्कआऊट करताना दिसतेय.
ADVERTISEMENT
या व्हीडियोमध्ये प्राजक्ताने अगदी मराठमोळ्या पद्धतीने साडी नेसली आहे. आणि साडीमध्ये प्राजक्ताने चेस्ट वर्ककाऊट केलं आहे. तिचा या व्हीडियोने फॅन्सचं लक्ष वेधून घेतलंय. तिच्या फॅन्सने हा व्हीडियो लाईक करत कमेंट्सचा पाऊसही पाडलाय.
साडीमध्ये वर्कआऊट करताना केसांचा आंबाडा, नाकात नथ तसंच माळलेला गजरा अशी लूकमध्ये प्राजक्ता थेट जीममध्ये पोहोचली होती. प्राजक्ता सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. विविध फोटोस तसंच व्हीडियोस ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली होती. या मालिकेत तिने येसूबाईंची भूमिका साकारली होती. त्यानंतर नांदा सौख्य भरे तसंच संत तुकाराम मालिकेतंही त्यांनी काम केलं. यानंतर अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी झालेल्या वादानंतर तिने आई माझी काळूबाई या मालिकेतून निरोप घेतला.
ADVERTISEMENT