बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत तिच्या अजब गजब विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकतंच जीममधून बाहेर पडताना पैपराजीने राखीला गाठलं. यावेळी त्यांनी राखीला वाढत्या कोरोनाबाबत प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना राखी सावंतने आपण कोरोनावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवू शकतो याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
राखीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोमध्ये राखी म्हणते, “सध्या अनेकजण अनेक जण कोरोनाची बनावट सर्टिफिकेट्स तयार आहेत. जर लोकांनी अशी बनावट सर्टिफिकेट काढणं बंद केलं तर कोरोनाचं प्रमाण नक्कीच कमी होईल. काही लोकं विमानाने प्रवास करतात. 600-800-1200 रूपये खर्च करून यांना टेस्ट करायची नाहीये. म्हणून ही लोकं कोरोनाचं खोटं सर्टिफिकेट दाखवून त्यांची कोरोना चाचणी झालीये असं सांगतात. अशा लोकांना मी हात जोडून विनंती करते की बनावट सर्टिफिकेट दाखवणं बंद करा.”
राखीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा अजून एक उपाय सांगितला तो म्हणजे मास्क लावण्याचा. 24 तास मास्क लावायचा असंही राखीने सांगितलं आहे. राखी म्हणाली, मी स्वतः नेहमी मास्क लावून फिरते. जीममध्ये देखील मी मास्क लावून वर्कआऊट करते.
दरम्यान एका फोटोग्राफरने राखीला बॉलिवूडमध्ये अनेकांना कोरानाची लागण झालीये असं सांगितलं. यावेळी विकी कौशललाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगित्यावर राखीला धक्का बसला. राखी आणि विकी एकाच जिममध्ये जातात. राखीने लगेच विक्कीच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त करत चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली.
ADVERTISEMENT