आणि अखेर संजु करणार रणजीतचे स्वप्न पूर्ण ! काही महिन्यांपूर्वी रणजितने संजुकडून एक वचन घेतले होते, की ढालेपाटलांच्या दारात पुन्हाएकदा लाल दिव्याची गाडी यावी. आणि रणजीतचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी संजुने घेतली. या प्रवासात संजुवर अनेक अडचणी आल्या आणि काही अडचणी राजश्रीने घडवून आणल्या तरी देखील संजुची जिद्द, निर्धार तितकाच खंबीर राहिला. रणजीत आणि संजुमध्ये काही काळ दुरावा देखील आला पण तरीदेखील संजुने धीर सोडला नाही. तिच्यासमोर एक ध्येय होते रणजीत यांना दिलेले वचन पूर्ण करणे. आणि आता तो दिवस आला आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. संजु अखेर पोलिस वर्दीमध्ये रणजीत समोर येणार आहे. या दिवसापासून संजु आणि रणजीतच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाणार आहे, एक नवा अध्याय सुरू होणार आहे. या प्रवासात काय काय घडेल, कशी संजुला रणजीतची साथ मिळेल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
ADVERTISEMENT
संजीवनी ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार म्हणाली, “संजु आता एका नव्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. या प्रवासात खूप नव्या गोष्टी मला शिकायला मिळायला आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी एका दिवसात बुलेट चालवायला शिकले. मनिराजने खूप मदत केली बाईक शिकायला. संजुने पोलिस होण हे माझ्यासाठी म्हणजेच शिवानीसाठी खूप जास्त जवळच आहे. मला खूप भारी संधी मिळाली आहे असं मला वाटतं. कारण, माझे वडील पोलिस खात्यात काम करतात (बॅक ऑफिस – सीनियर हेड क्लार्क). जेव्हा मी पहिल्यांदा वर्दी घालून त्यांना व्हिडिओ कॉल केला तेव्हा काही सेंकदचा डेड pause गेला आमच्यामध्ये. त्यांना झालेला आनंद बघून मला भरून आलं”.
ADVERTISEMENT