महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सेलिब्रेटीही कोरोना लसीचा डोस घेत आहेत. आता यात भर पडलीय ती सुपरस्टार सलमान खानची. सलमान खानने बुधवारी मुंबईत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. कोरोनाचा प्रसार बॉलिवूडमध्येही पसरत आहे. आमिर खान,रणबीर कपूर,मनोज वाजपेयी, कार्तिक आर्यन या बॉलिवूडमधील सुपरस्टार्सना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने खबरदारी म्हणून सलमान खानने बुधवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला
ADVERTISEMENT
सलमान खानने कोरोनाची लस घेतल्यानंतर सोशल मिडीयावर एक पोस्ट लिहीत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला अशी एका ओळीची पोस्ट केली. सलमान खानच्या आधी आज संजय दत्तने ही कोरोनाची लस घेतली. याआधी बॉलिवूडमधील सैफ अली खान,अनुपम खेर,परेश रावल,हेमा मालिनी,धमेंद्र,शर्मिला टागोर,नीना गुप्ता,सतीश शहा,जॉनी लिव्हर,राकेश रोशन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या यादीत आता सुपरस्टार सलमान खानचीही भर पडली आहे.
ADVERTISEMENT