सध्या देशात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फार गाजतोय. गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांची प्रतिक्रिया दिली असून यावर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. मात्र त्याच्या या भूमिकेमुळे अनेकजण संभ्रमात पडले आहेत.
ADVERTISEMENT
गुरुवारी सलमानला शेतकरी आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सलमान म्हणाला, “मी शेतकरी आंदोलनासंदर्भात नक्की भाष्य करणार. जे योग्य आहे ते व्हायला पाहिजे…बरोबर आहे ते बरोबर व्हावं…सर्वांसाठी.” सलमानच्या या भूमिकेने ना त्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय ना विरोध केलाय. तर या मुद्द्यावर अजून शाहरूख खान आणि मिस्टर परफेशनिस्ट आमिर खानने प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान यामध्ये इतर अनेक सेलिब्रिटींनी ट्विट करत सरकारच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केलीये. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केलंय. तो म्हणाला, शेतकरी आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातायत. त्यामुळे मतभेद निर्माण करणाऱ्यांपासून दूर राहा. यासोबत अक्षयने #IndiaTogether अशा हॅशटॅग दिलाय. तर भारताविरोधातल्या दुष्प्रचाराला बळी पडू नका असं अभिनेता अजय देवगणने म्हटलंय.
करण जोहरनेही #IndiaTogether हा हॅशटॅग वापरत, “अडचणीच्या काळात आपण संयम राखणं गरजेचं आहे. सर्वांसाठी हिताचा असणारा उपाय काढण्यासाठी एकत्र येऊ. शेतकरी देशाचा कणा आहेत. आम्ही कोणालाही देशाचं विभाजन करू देणार नाही. असं म्हटलंय.
पाहा सलमान खान नेमकं काय म्हणाला?
ADVERTISEMENT