Gutkha Ad Case : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) , किंग खान शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि अजय देवगण (Ajay Devgan) या तीन अभिनेत्यांना लखनऊ हायकोर्टाने (Lucknow Bench) नोटीस बजावली आहे. पान मसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याची माहिती आहे. या अभिनेत्यांसह कंपनीला देखील नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीने तीनही अभिनेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (shahrukh khan ajay devgan akshay kumar tobacco advertisement issued notice central government lucknow court)
ADVERTISEMENT
अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने आपले उत्तर दिले आहे. पान मसाल्याची (गुटख्याची) जाहिरात केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने लखनऊ खंडपीठाला दिले आहे.
हे ही वाचा : Mayawati : बसपा अध्यक्षा मायावतींचा वारसदार ठरला! कोण आहे आकाश आनंद?
केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी लखनऊ खंडपीठात न्यायमूर्ती राजेश चौहान यांच्या खंडपीठासमोर असा युक्तिवाद केला की, अक्षय कुमार गुटख्याला प्रोत्साहन देण्यासाठी दोषी आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या वतीने शाहरुख खान आणि अजय देवगण यांना ऑक्टोबर महिन्यात नोटीस बजावण्यात आली आहे.
अधिवक्ता मोतीलाल यादव यांनी दाखल केलेल्या या याचिकेत भारत सरकारच्या पद्म पुरस्काराने सन्मानित कलाकारांकडून गुटख्याची जाहिरात केली जात आहे. गुटख्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांमुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे. ऑगस्ट 2023 रोजी उच्च न्यायालयाने या याचिकेवर नोटीसला उत्तर न दिल्याने कॅबिनेट सचिव, मुख्य आयुक्त आणि ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांना अवमान नोटीस बजावली होती.
हे ही वाचा : Crime : दहा वर्षीय मुलीची हत्या केली, मग जोडप्याने घेतला गळफास; रिसॉर्टमध्ये काय घडलं?
या नोटीसीवर उत्तर दाखल करताना शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारचे डेप्युटी सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण यांना 2O ऑक्टोबर महिन्यात नोटीस देण्यात आली आहे. याच अभिनेते अमिताभ बच्चन यांनी संबंधित पान मसाला कंपनीला कंपनीसोबतचा करार संपूनही जाहिरातीत गुटखा दाखवल्याप्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या नोटीसीनंतर आता लखनऊ खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 मे 2024 रोजी ठेवली आहे. या नोटीसीवर आता अभिनेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT