Crime News: उत्तर प्रदेश: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey Suicide Case) हिच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक बातमी समोर आली आहे. आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आकांक्षा दुबेच्या कपडे तपासले असता त्यावर वीर्याचे नमुने सापडले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं असून पोलिसांच्या तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे. आता वाराणसी पोलिसांनी भोजपुरी गायक समर सिंग आणि तुरुंगातील मुख्य आरोपी संजय सिंह यांच्यासह चार जणांची डीएनए चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे.
ADVERTISEMENT
आकांक्षाच्या कपड्यांवरून धक्कादायक खुलासा
26 मार्च रोजी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने सारनाथ येथील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आकांक्षा दुबेच्या कुटुंबीयांच्या वतीने ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे म्हटलं आहे. आकांक्षा दुबे प्रकरणात भोजपुरी गायक समर सिंह आणि संजय सिंह यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. पोलिसांनी समर सिंग आणि संजय सिंग यांना अटक करून तुरुंगात पाठवले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. न्यायालयाने समर सिंहसह चौघांची डीएनए चाचणी करण्याचे आदेश पोलिसांना दिले तर लवकरच आकांक्षा दुबेच्या आत्महत्येचे सत्य समोर येईल.
हे ही वाचा >> Maharashtra SSC Result 2023 : निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल
पोलिसांनी न्यायालयाकडे केली ‘ही’ मागणी
याबाबत अधिक माहिती देताना वाराणसीचे अतिरिक्त आयुक्त संतोष सिंह म्हणाले की, या प्रकरणात आमच्याकडे फारसे पुरावे नाहीत. मृताच्या जुन्या कपड्यांच्या आधारे समर सिंह, संजय सिंह संदीप आणि अरुण राय या चार आरोपींचे डीएनए नमुने जुळवण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. न्यायालयाचा आदेश येताच कायदेशीर कारवाई केली जाईल.
आकांक्षाच्या मृत्यूने अनेक सवाल उपस्थित
त्याचवेळी, या प्रकरणात आकांक्षा दुबेच्या कुटुंबाचे वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी सांगितले की, ‘आकांक्षा दुबेच्या कपड्यांवर वीर्य सापडल्याची पुष्टी झाली आहे. त्याच्यासोबत तिच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडलं असल्याचंही कुटुंबीयांकडून सतत बोललं जात होतं. कारण आकांक्षा दुबेने परिधान केलेले कपडे तिचे नाहीत. आधी तिच्यावर अत्याचार झाला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी पकडले नाही, व्हिसेरा रिपोर्ट आला नाही आणि पोलीसच याला आत्महत्या म्हणत आहेत. आता कपड्यांवर वीर्य सापडल्याने या घटनेमागील लोकांचाही पर्दाफाश होणार आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> मुंबई Tak चावडी: ‘2019मध्ये शिवसेनेशी युतीचा निर्णय ही भाजपची चूकच’, विनोद तावडेंचा गौप्यस्फोट
या सगळ्यामुळे आता आकांक्षाच्या मृत्यूबाबतचं गूढ अधिकच वाढलं असून आता याबाबत पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT