ADVERTISEMENT
टीव्ही इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. पण आता तो आपल्यामध्ये राहिलेला नाही.
बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं मुंबईत राहत्या घरी निधन झालं आहे.
दरम्यान, सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कारण सिद्धार्थ प्रत्येकाला आपल्या जवळचा असा वाटणारा अभिनेता होता.
40 वर्षीय सिद्धार्थच्या निधनाने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक जण शोक व्यक्त करत आहे.
24 ऑगस्ट रोजी सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्राम हे पोस्ट केलं होतं.
यावेळी अनेक अभिनेते, अभिनेत्री आणि इतर दिग्गजांनी सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये सिद्धार्थने फ्रंटलाइन वर्कर्सचे मनापासून आभार मानले होते.
ADVERTISEMENT