सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारावेळी कोण-कोण सेलिब्रिटी होते हजर?

मुंबई तक

• 11:32 AM • 03 Sep 2021

सिद्धार्थला आपली ही सर्वात जवळची व्यक्ती होती. तसंच सिद्धार्थला दोन मोठ्या बहिणी देखील आहेत. अभिनेत्री आणि बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल ही देखील सिद्धार्थ शुक्लाच्या अत्यंसंस्कारवेळी स्मशानात पोहचली होती. सिद्धार्थचं निधन हा धक्काच अद्याप शहनाज पचवू शकलेली नाही. जेव्हा ती इथे आली तेव्हा तिने अक्षरश: टाहो फोडला. बिग बॉस 13चा पहिला रनर अप […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सिद्धार्थला आपली ही सर्वात जवळची व्यक्ती होती. तसंच सिद्धार्थला दोन मोठ्या बहिणी देखील आहेत.

अभिनेत्री आणि बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल ही देखील सिद्धार्थ शुक्लाच्या अत्यंसंस्कारवेळी स्मशानात पोहचली होती.

सिद्धार्थचं निधन हा धक्काच अद्याप शहनाज पचवू शकलेली नाही. जेव्हा ती इथे आली तेव्हा तिने अक्षरश: टाहो फोडला.

बिग बॉस 13चा पहिला रनर अप आसिम रियाज देखील सिद्धार्थच्या घरी गेला होता.

अभिनेता अली गोनी हा स्मशान भूमीत उपस्थित होता. गुरुवारी तो त्याचा घरी देखील गेला होता.

दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा देखील स्मशान भूमीमध्ये आला होता. असं म्हटलं जात की, राहुल आणि सिद्धार्थ हे एकमेकांचे चांगले मित्र होते.

अभिनेत्री दिलीजीत कौर ही देखील स्मशान भूमीत आली होती. ती देखील बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाली होती.

दुसरीकडे सिद्धार्थच्या घरी देखील अनेक सेलिब्रिटी गेले होते. अभिनेता अर्जुन बिजलानी हा देखील सिद्धार्थच्या घरी गेला होता.

बिग बॉस 14 ची सेकंड रनर अप निक्की तांबोळी देखील त्याच्या घरी गेली होती.

अभिनेत्री राखी सावंत ही देखील सिद्धार्थच्या घरी गेली होती. तिने सोशल मीडियावर देखील आपलं दु:ख व्यक्त केलं होतं.

यावेळी पंजाबी गायक आणि अभिनेत्री शहनाद गिल हिचा भाऊ शहबाज गिल हा देखील सिद्धार्थच्या घरी आणि स्मशानात उपस्थित होता.

    follow whatsapp