बॉलिवूड गायिका शिल्पा राव विवाहबंधनात अडकली आहे. शिल्पाने तिचा लहानपणीचा मित्र रितेश क्रिश्नन याच्यासोबत सप्तपदी घेतलीये. रितेश आणि शिल्पा गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अखेर ते दोघं 25 जानेवारी रोजी लग्नच्या बेडीत अडकले आहेत.
ADVERTISEMENT
शिल्पाने सोशल मिडीयावर तिचा आणि रितेशचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोला शिल्पाने मिस्टर अँड मिसेस बनल्यानंतर आमचा पहिला सेल्फी असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या सेल्फीवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
शिल्पाने तिच्या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोकांना बोलवलं होतं. काही दिवसांपूर्वी शिल्पाने तिचा आणि तिच्या पतीचा बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोला तिने गमतीशीर कॅप्शनही दिलं होतं. आम्हा दोघांमध्ये एक सारखी गोष्ट म्हणजे आम्ही फोटो काढताना हसायचो नाही. पण आता आम्ही हसत हसत आयुष्य काढू, असं शिल्पाने कॅप्शनमध्ये म्हटलंय.
2007 साली आलेल्या अनवर सिनेमातील तोसे नैना लागे या गाण्याने शिल्पा प्रसिद्ध झाली होती. तिने आतापर्यंत गुलजार, ए.आर रहमान तसंच यश चोप्रा यांच्यासोबत काम केलंय.
ADVERTISEMENT