Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाने गुपचूप केला साखरपुडा, सलमान खाने घालून दिली होती भेट?

मुंबई तक

• 02:12 AM • 10 May 2022

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या चाहत्यांना आज धक्का दिला. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गुड न्यूज शेअर केली. सोनाक्षीने साखरपुडा केला असून, इन्स्टाग्रामवरील फोटोत सोनाक्षी सिन्हा बोटातील अंगठी दाखवता दिसत आहे. साखरपुडा झाल्याची माहिती सोनाक्षीने चाहत्यांना दिली खरी, मात्र तिने ज्याच्यासोबत साखरपुडा झाला. त्या व्यक्तीचं नाव गुपित ठेवलं आहे. रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही व्यक्ती […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिच्या चाहत्यांना आज धक्का दिला. सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत गुड न्यूज शेअर केली.

सोनाक्षीने साखरपुडा केला असून, इन्स्टाग्रामवरील फोटोत सोनाक्षी सिन्हा बोटातील अंगठी दाखवता दिसत आहे. साखरपुडा झाल्याची माहिती सोनाक्षीने चाहत्यांना दिली खरी, मात्र तिने ज्याच्यासोबत साखरपुडा झाला. त्या व्यक्तीचं नाव गुपित ठेवलं आहे.

रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीप्रमाणे ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून, अभिनेता जहीर इक्बाल आहे. जहीर खानचं नाव यापूर्वी सोनाक्षीसोबत चर्चेत आलेलं आहे.

मागील बऱ्याच कालावधीपासून सोनाक्षी आणि जहीर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघांनीही याबद्दल कोणतंही भाष्य केलेलं नाही.

जहीर इक्बालने ‘नोटबुक’, ‘डबल XL’, ‘कमाल खान :बुमरो’मध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. जहीर इक्बालचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमान खानचे बालपणीचे मित्र आहेत.

जहीर इक्बालने अभिनयाबरोबरच २०१४ मध्ये सोहेल खानचा चित्रपट ‘जय हो’मध्येही काम केलेलं आहे. या चित्रपटात असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे.

जहीर आणि सोनाक्षीच्या डेटिंगबद्दल बोलायचं झालं, तर सलमान खानने दोघांची भेट घालून दिली होती, असं सांगितलं जातं. काही दिवसांपूर्वी जहीरने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीबद्दलच्या रिलेशनशिपबद्दल म्हटलं होतं की, ‘बऱ्याच दिवसांपासून मी हे ऐकतोय. आता मला याची काळजी करत नाही.’

‘जर तुम्हाला असं वाटत असेल, तर तो तुमचं मत आहे. ते तुमच्यासाठी चांगलं आहे. मी तिच्यासोबत (सोनाक्षी) आहे असा विचार करून तुम्हाला आनंद होत असेल, तर तुमच्यासाठी ही आनंददायी बाब आहे,’ असं तो म्हणाला होता.

‘ही गोष्ट इंडस्ट्रीचा भागच आहे. इंडस्ट्रीत पर्दापण करण्यापूर्वीच मला हे माहिती होतं. सलमान खान नेहमीच सांगतो की, असं बरेच लोक लिहितील, पण त्याकडे लक्ष देऊ नको. त्यामुळेच मी त्याकडे लक्ष देत नाही.’

    follow whatsapp