Chhava Movie Teaser : विक्की कौशल आणि रश्मिका मंदानाचा बहुप्रतिक्षीत असलेल्या छावा चित्रपटाचा टीझर प्रदर्शीत करण्यात आला आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार असून आज धडाकेबाज टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता विक्की कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारली आहे. छावा चित्रपटाच्या माध्यमातून संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे. विक्कीचा जबरा लूक आणि थरारक अॅक्शन पाहून चाहत्यांनाही धडकी भरली असेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ADVERTISEMENT
टीझरच्या आधी विक्की कौशलने केला 'छावाचा' पहिला पोस्टर रिलीज
टीझर रिलीज करण्यापूर्वी विक्की कौशलने चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. विक्की शेकडो सैनिकांसोबत लढाई करत असल्याचं या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमध्ये युद्धाचे अनेक सीन दाखवण्यात आले आहेत. यामध्ये विक्की कौशल दमदार आणि कमांडिंग रोलमध्ये झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा >> "मी जर राजकारण आलो, तर..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांना मनोज जरांगेंचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
विक्कीचा लूक बाहून बाजीराव मस्तानीच्या रणवीर सिंगची झाली आठवण
विक्कीचा हा मराठा सम्राटचा लूक पाहून चाहत्यांना बाजीराव मस्तानीच्या रणवीर सिंगच्या रोलची आठवण झालीय. विक्की कौशलने छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंधाना त्यांच्या पत्नीच्या (येसूबाई भोसले) भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असून सिनेविश्वात याची तुफान चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा >> टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज KKR सोडणार? कोणत्या संघात खेळणार? IPL लिलावाआधी दिले संकेत
लक्ष्मण उटेकर यांच्या दिग्दर्शनात छावा चित्रपट बनवण्यात आला आहे. छावा चित्रपट एक ऐतिहासिक ड्रामा आहे. या चित्रपटात विक्की छत्रपती संभाजी महाराजांचा भूमिकेत झळकणार आहे. तर रश्मिका मंधाना येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
ADVERTISEMENT