सध्या सोशल मीडियावर पावरी हो रही है हे फार ट्रेडिंगमध्ये आहे. आणि अभिनेता विवेक ओबेरॉय अजूनही या पावरीच्या मूडमधून बाहेर आलेला दिसत नाहीये. दरम्यान विवेकने नुकतंच पावरी हो रही है या स्टाईलमध्ये एक व्हीडियो शेअर केला आहे. हा व्हीडियो विवेकच्या चाहत्यांनाही फार आवडलाय.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हीडियो व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या व्हीडियोमध्ये विवेक विनाहेल्मेट आणि विनामास्क मुंबईत सार्वजनिक ठिकाणी बाईक राईड करत होता. यानंतर विवेकला ई-चलान पाठवण्यात आलं. आणि या ई-चलानवरून विनेकने पावरी स्टाईल व्हीडियो तयार केलाय.
या व्हीडियोमध्ये विवेक ओबेरॉय म्हणतो, “ये हम है, हे हमारी बाईक्स है और ये हमारी पावती कट गयी है.” या व्हीडियोमध्ये विवेकने त्याला पाठवण्यात आलेल्या ई-चलानची कॉपीही दाखवली आहे.
दरम्यान विनाहेल्मेट आणि विनामास्कचा व्हीडियो व्हायरल झाल्यानंतर विवेक ओबेरॉय याने ट्विट करून दिलगिरी व्यक्त केली होती. सुरक्षेची काळजी सर्वात प्रथम घेतली पाहिजे, याची जाणीव करुन दिल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभारही त्याने मानले होते. बाईकवरुन प्रवास करताना हेल्मेट आणि मास्क घाला, असंही विवेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT