ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे इतकं कळकळीने सोशल मिडीयावर येऊन माफी मागत आहेत. त्यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे. महेश कोठारे यांनी आजवर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यांच्या बहुतेक मालिकांना प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला. त्यातीलच एक म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका, या मालिकेला देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे मात्र ही मालिका नुकतीच वादाच्या भोवऱ्यात अडकली.
ADVERTISEMENT
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या १४ सप्टेंबरच्या भागात त्यातील एका पात्राच्या ब्लाउजवर वंदनीय बुद्ध यांचे चित्र होते. त्यावरून अनेकांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याने त्या पात्रावर आणि मालिकेच्या टीमवर आक्षेप नोंदवला गेला. तर या घटनेचा कडाडून विरोध देखील केलेला पाहायला मिळाला. या घटनेबद्दल महेश कोठारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे.
मला आमच्या संपूर्ण टीमला गौतम बुद्धाविषयी खूप आदर आहे. आमच्याकडून किंवा मालिकेच्या कुठल्याही टीम कडून पुन्हा अशी चूक होणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. आमच्या टीम तर्फे, युनिट तर्फे आणि मालिकेच्या कलाकारांतर्फे आज मी जाहीर पणे तुम्हा सर्वांची माफी मागतो आहे…असे महेश कोठारे या व्हिडिओद्वारे सांगत आहेत…
ADVERTISEMENT